एक्स्प्लोर

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेची स्थिती काय? कसं असणार पुढचं राजकारण? काय आहेत पराभवाची कारणं? 

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena Thackeray Group) कोकणात (Konkan) धुव्वा उडालाय. मात्र, भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेची स्थिती काय असणार याचा आढावा.

Shivsena Konkan Politicis News : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाविकास आघाडीसह ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena Thackeray Group) कोकणात (Konkan) धुव्वा उडाला आहे. त्यामुळं, ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य कोकणात कसं असणार? याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. पदाधिकारी देखील एकमेकांवर आरोप करत सरळपणे भिडताना दिसत आहेत. तसंच, याचा परिणाम हा मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण या ठिकाणच्या राजकारणावर देखील होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

कोकणात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाधार किती? भविष्यात ठाकरेंचं कोकणातील राजकारण कसं असणार? कोकणी माणसाची बरोबर किती राहणार? यासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास शिवसेनेचा केवळ एकच शिलेदार विधानसभेत दाखल झाले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक म्हणजे 8 पैकी 7 जागा लढवल्या होत्या. पण, पदरी निराशाच. त्यामुळं ठाकरेंनी गमावलेल्या जनाधाराचा अर्थ सध्या विविध अंगांनी चर्चा करुन काढला जातोय.

महानगर पालिकांच्या निवडणुकीत काय होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह मुंबई, ठाणे सारख्या शहरांमधील महानगर पालिकांच्या निवडणुकी देखील लवकरच होतील. त्या ठिकाणी देखील त्यांना त्याचा फटका बसू शकतो अशी चर्चा सध्या सुरू झालीय. कोकणातील चाकरमानी निवडणुकांमध्ये मोठी भूमिका बजावत असतो. पण, यावेळी सारी गणितं चुकली आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील महाविकास आघाडी पर्यायानं  ठाकरेंचा करिष्मा चालला नाही असं नक्कीच म्हणता येईल.

पराभवाची कारणं काय?

पक्षात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी अपेक्षित असं लक्ष किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला नसल्याचं बोललं जात आहे. केवळ मोठ्या बैठका घेऊन प्रचार करण्यावर समाधान मांनलं आहे. तर कोकणी माणसाला भावनिक साद घालण्यात आलेले अपयश. स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत वाद, पदाधिकाऱ्यांची झालेली मनमानी भूमिका आणि त्यावर नसलेला अंकुश. तसेच, ठाकरेंनंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी देखील कोकणात लक्ष केंद्रीत न करता केलेली गटबाजी. तसेच उमेदवारांनी अपेक्षित असलेली 'रसद' पोहोचवण्यासाठी ठाकरेंना आलेले अपयश यासारखी कारणं सांगितली जात आहेत. साधारणपणे 1985 ते 1990 यानंतर कोकणात एकसंध शिवसेना वाढली. पण, जवळपास दोन ते तीन दक्षकांच्या या राजकीय वर्चस्वाला आणि जनाधाराला मात्र लोकसभेनंतर आणि विधानसभा निवडणुकीनंतर चांगलाच धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget