Ratnagiri Travel Guide: महाराष्ट्राच्या निसर्गसौंदर्याचं दर्शन घडवणारा रत्नागिरी; 'या' ठिकाणं पाहिली नसतील तर आवर्जुन भेट द्या!
Ratnagiri Travel Guide: छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट, प्राचीन मंदिरं आणि जगाला भूरळ घालणारे अथांग असे समुद्रकिनाऱ्यांसाठी रत्नागिरी ओळखलं जातं.
Maharashtras Ratnagiri Travel Guide : रत्नागिरी : 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' प्रत्येक महाराष्ट्रातील (Maharashtra News) माणूस गर्वानं हे वाक्य उद्गारतो. आपल्या महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा (Historical Heritage of Maharashtra) जेवढा मोठा आहे, तेवढाच महाराष्ट्र सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या समृद्ध आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक तसेच सुंदर आणि आश्चर्यकारक ठिकाणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट, प्राचीन मंदिरं आणि जगाला भूरळ घालणारे अथांग असे समुद्रकिनाऱ्यांनी महाराष्ट्राची ओळख होते. जगभरातून अनेक पर्यटक महाराष्ट्र भ्रमंतीवर येत असतात.
महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. जसं की, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai), महाबळेश्वर (Mahabaleshwar), लोणावळा (Lonavala), खंडाळा (Khandala) आणि पाचगणी. पण महाराष्ट्रात वसलेलं रत्नागिरी हे देखील एक असं ठिकाण आहे, जे अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे. रत्नागिरीत अशी अनेक सुंदर आणि आकर्षक ठिकाणं आहेत. त्यामुळे तुम्ही अजून रत्नागिरीला (Ratnagiri News) भेट दिली नसेल, तर नक्की भेट द्या आणि आम्ही सुचवलेल्या ठिकाणांना नक्की भेट द्या.
गणपतीपुळेचा समुद्रकिनारा (Ganpatipule Beach)
जेव्हा आपण रत्नागिरीतील सर्वात सुंदर आणि प्रेक्षणीय ठिकाणांबद्दल बोलतो, तेव्हा या यादीत गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्याचा समावेश आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य अप्रतिम आहे. गणपतीपुळेचा समुद्रकिनारा हे सर्वोत्कृष्ट ठिकाण मानलं जातं, जिथे तुम्ही सुंदर समुद्रकिनारा तसेच शांत वातावरणासाठी भेट देऊ शकता. नारळाच्या झाडाखाली बसून तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
गणपतीपुळे मंदिर (Ganapatipule Temple)
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थिर गणपतीपुळे मंदिराला अतिप्राचीन आणि प्रसिद्ध म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, या मंदिराचा इतिहास 400 वर्षांहून जुनं आहे. इथे स्थित असलेल्या गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याचं मानलं जातं. सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यासोबतच गणपतीपुळे गणपती मंदिरही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
जयगड किल्ला (Jaigad Fort)
रत्नागिरी जिल्ह्यात असलेला जयगड किल्ला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक किल्ला आहे. याला विजय किल्ला असंही म्हणतात. हा अप्रतिम किल्ला 16व्या शतकात बांधला गेला. जयगड किल्लाही पर्यटकांसाठी खास आहे. समुद्रकिनाऱ्याजवळून दररोज हजारो पर्यटक येथे येतात. किल्ल्यावरून समुद्राच्या लाटांचे अनोखे दृश्य पाहायला मिळते. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्यही पर्यटकांना भुरळ घालते.
गुहागर सुमद्रकिनारा (Guhagar Beach)
रत्नागिरीपासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुहागरच्या समुद्रनिकारा रत्नागिरीतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हा सुंदर समुद्रकिनारा त्याच्या सौम्य हवामानासाठी आणि सुंदर लाटांसाठी प्रसिद्ध आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्या अॅडव्हेंर वॉटर स्पोर्ट्ससाठीही प्रसिद्ध आहे. तुम्ही स्पीड बोट, बंपर ड्राईव्ह, बनाना राईड इत्यादी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
थिबा पॉईंट (Thiba Point)
थिबा पॉईंट म्हणजे, थिबा पॅलेस. थिबा पॉईंटवरून शहराचं सुंदर दृश्य दिसतं, असं सांगितलं जातं. येथून रत्नागिरीच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची संधी मिळते. याशिवाय लाईट हाऊस आणि धूतपेश्वर मंदिर ही देखील पाहण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत.