एक्स्प्लोर

महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या काकाच्या विरोधात, रामदास कदमांच्या विरोधात अनिकेत कदमांचा शड्डू

Ramdas Kadam Vs Aniket Kadam : गेल्या तीन वर्षात आमच्यावर ईडी, इन्कम टॅक्सची धाड पडली. या काळात खूप सहन केलं असं वक्तव्य रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम यांनी केलं. 

रत्नागिरी : महाराष्ट्रातील राजकारणात काका-पुतण्याचा संघर्ष सर्वांना परिचित आहे. यापूर्वी मुंडे काका-पुतण्या, ठाकरे काका-पुतण्या, पवार काका-पुतण्या असे अनेक संघर्ष महाराष्ट्राने पाहिले आहेत. आता कोकणात देखील राजकारणातील काका-पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनीदेखील त्यांच्याविरोधात दंड थोपटला आहे. 

रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी आता राजकारणात सक्रिय होण्याचा निर्धार केला आहे. आगामी निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे मात्र त्यांच्या या निर्धारामुळे काका पुतण्यांमधील संघर्ष कोकणासोबतच संपूर्ण महाराष्ट्राला देखील पाहायला मिळणार आहे.

तीन वर्षे खूप सहन केलं

मागील तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली, ईडीची धाड पडली. साई रिसॉर्ट म्हणून जे प्रकरण गाजलं ते सर्व कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप वेळ सहन केलं आहे. जिल्हाध्यक्ष संजयकाका कदम यांना कसंही करून निवडून आणायचा निर्णय आता आम्ही घेतलाय. मागील तीन वर्षात त्यांनी आम्हाला मानसिक खूप सपोर्ट केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले. आता आमचं कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचं. यापूर्वी देखील ते राष्ट्रवादीतून आमदार होते, आता ते शिवसेनेत आहेत. 

रामदास कदम यांच्यावर प्रतिक्रिया देताना अनिकेत कदम म्हणाले की, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार.

माझी राजकारणात सुरूवात 

अनिकेत कदम म्हणाले की,मी एक व्यावसायिक माणूस आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झालं आहे. प्रत्येकाची एक सुरुवात असते. जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही विचार करू. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 25 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 march 2025ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 25 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सPoliticians on Waghya Dog : रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी Special report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget