Agriculture News : बदलत्या वातावरणाचा आंबा पिकावर परिणाम, तुडतुडा रोगासह मोठ्या प्रमाणात फळगळ
Agriculture News : बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agricultural crops) मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
Agriculture News : सध्या वातावरणात सातत्यानं बदल (climate change) होत आहे. कधी थंडीचा जोर (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसानं (Rain) देखील हजेरी लावली आहे. मात्र, या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agricultural crops) मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणामुळं रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील आंब्यावर (Mango) तुडतुडा, फळगळ होत आहे. त्यामुळे यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात दमदार होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Mango Production : आंबा उत्पादनात मोठी घट होणार
बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. आंबा पिकावर देखील बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम होत आहे. कोकणातील आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर अनेक ठिकाणी फळगळ सुरु आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आंबा उत्पादनात मोठी घट होणार आहे. अनेक ठिकाणी झाडांना मोहर आलेला नाही तर काही ठिकाणी मोहरामध्ये फळधारणा झालेली आहे. यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळं आंबा बागायतरांवर संकट निर्माण झालं आहे.
आधीच अतिवृष्टीचा मोठा फटका, त्यात पुन्हा रोगांचा प्रादुर्भाव
यावर्षी परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली आहेत. परतीच्या पावसाचा मुक्काम यावर्षी दिवाळीपर्यंत लांबला होता.याचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला होता. दिवसा ऊन आणि रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्यानं बदल होत आहे. किटकनाशकांची फवारणी करुन दोन्ही कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
फवारण्या करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा खर्च
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर तु़डतुडा आणि थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा आंब्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळ हापूस आंब्याच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बाग चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे. या फवारण्याचा खर्चही मोठा असणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Mango Farming : हवामानातील बदलाचा आंबा बागायतदारांना फटका, 90 टक्के झाडांना पालवी, पण 10 टक्के झाडांनांच मोहोर