Mango Farming : हवामानातील बदलाचा आंबा बागायतदारांना फटका, 90 टक्के झाडांना पालवी, पण 10 टक्के झाडांनांच मोहोर
Mango Farming : हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळं (Climate change) आंबा बागायतदार (Mango Farming ) हैराण झाले आहेत.
Mango Farming : हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळं (Climate change) आंबा बागायतदार (Mango Farming ) हैराण झाले आहेत. या बदलांमुळं पिकांच्या विशेषत: आंब्याच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या 90 टक्के झाडांना पालवी आली आहे. त्यामुळं मोहोर प्रक्रिया उशिराने होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळं तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी (Spraying of pesticides) करावी लागत असल्यानं, आंबा बागायतदार हैराण झाले आहेत.
90 टक्के झाडांना पालवी, फक्त 10 टक्के झाडे मोहोराकडे वर्ग
यावर्षी परतीच्या पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली आहेत. परतीच्या पावसाचा मुक्काम यावर्षी दिवाळीपर्यंत लांबला होता. त्यामुळं सध्या 90 टक्के झाडांना पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडे मोहराकडे वर्ग होत आहेत. दिवसा ऊन आणि रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. किटकनाशकांची फवारणी करुन दोन्ही कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हापूसचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी पालवीवरील थ्रीप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.
हापूसच्या उत्पादकतेवर परिणाम होणार
मोहराला लागलेली अळी जर नष्ठ केली नाही तर तो मोहोर कुजवून टाकतो. तुडतुड्यांचा आंब्यावर प्रादुर्भाव झाल्यानं आंब्यांची प्रकाश संसल्शेन प्रक्रिया थांबत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळं झाडांना येणाऱ्या मोहर थांबण्याची दाट शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळं बागांवर फवारणी करुन ती बाग वाचवणं हे शेतकतऱ्यांसमोर मोठं आव्हान असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. आंब्याचं पीक चांगलं ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
बागा चांगल्या ठेवण्यासाठी औषधांवर मोठा खर्च
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर तु़डतुडा आणि थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा आंब्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळ हापूस आंब्याच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बाग चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Hapus : यंदा कोकणचा 'हापूस' लवकरच मिळणार, वातावरणातील बदलामुळं आंब्याला मोहोर