Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह हजारो शिवभक्तांची उपस्थिती
Shivrajyabhishek Din 2023 : यंदा किल्ले रायगडवर (Raigad Fort) शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय.
Raigad Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यभिषेक सोहळ्याला तिथीनुसार आज 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदा किल्ले रायगडवर (Raigad Fort) शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek) मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतोय. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकाळी नऊ वाजेच्या सुमाराला किल्ले रायगडावर दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर किल्ल्यावर शाही शोभायात्रा देखील निघणार आहे. किल्ले रायगडावर तत्कालीन राजदरबार उभारण्यात आला आहे, तसेच शिवभक्तांची उत्तम सोयही करण्यात आली आहे.
सकाळी 7 वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते आज रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर श्री शिवसन्मान सोहळा संपन्न झाला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिवपालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
पाहा व्हिडीओ : Shivrajyabhishek Sohala : रायगडावर तिथीनुसार 350वा शिवराज्याभिषेक सोहळा
राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाची तयारी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. राज्यभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. या कार्यक्रमासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
- रायगडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे.
- उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.
- शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत.
- गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.
- गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे.
- रायगड किल्ले परिसरात जवळपास 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येईल
- याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरीमार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.