एक्स्प्लोर

Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या

Indigo Crisis : इंडिगोनं गेल्या चार दिवसात 1000 हून अधिक फ्लाईट रद्द केल्या आहेत. देशभरात झालेल्या गदारोळानंतर डीजीसीएनं साप्ताहिक सुट्टीचा नियम मागं घेतला.

Indigo Crisis नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या बुधवार आणि गुरुवार मिळून 450 हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगोचा प्रवासी विमान वाहतुकीतील हिस्सा 65 टक्के आहे.  यामुळं देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.देशभरातील प्रत्येक विमानतळांवर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. इंडिगोच्या 450 फ्लाईट रद्द झाल्यानं इतर विमान कंपन्यांसह इंडिगोनं देखील तिकिटाचे दर वाढवले आहेत. इंडिगोनं गेल्या चार दिवसांमध्ये 1000 हून अधिक फ्लाईट रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. याचा फटका दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद या ठिकाणच्या प्रवाशांना बसला. अखेर या परिस्थितीवर डीजीसीएनं  मार्ग काढण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून लागू केलेलं एफडीटीएल नोटिफिकेशन लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. 

सॉफ्टवेअर अपडेशनमुळं पहिल्यांदा फ्लाईट रद्द

एअरबस A320 च्या सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या ग्लिचमुळं पहिल्यांदा फ्लाईट रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ड्यूटी टाइम लिमिटेशन नियम लागू झाल्यानं मोठ्या संख्येनं पायलट आणि क्रू सुट्टीवर गेले. यामुळं इंडिगोच्या फ्लाईट रद्द कराव्या लागल्या.

Indigo Flight Cancel Reason : इंडिगोच्या फ्लाईट रद्द होण्याची कारणं? 

इंडिगोनं फ्लाईट रद्द कराव्या लागल्या त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली. त्यामध्ये सॉफ्टवेअरमधील ग्लिच, हिवाळ्यामुळं वेळापत्रकातील बदल, वातावरण या कारणामुळं फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं कारणं सांगितलं गेलं. मात्र, हवाई उद्योगातील जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द कराव्या लागण्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानं ही समस्या निर्माण झाली. एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं पायलट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले होते. 

FDTL च्या अंमलबजावणीमुळं काय बदललं?

एफडीटीएलचे नियम जानेवारी 2024 मध्ये आणले गेल होते. मात्र, त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरु कऱण्यात आली होती. पायलट आणि क्रू मेंबर्सला पहिल्यांदा आठवड्यात 36 तास सुट्टी    असायची ती वाढवून 48 तास करण्यात आली होती.  नाईट लँडिंगची संख्या 6 वरुन प्रत्येक आठवड्यात 2 वर आणण्यात आली होती. रात्रीच्या वेळी 8 तास उड्डाणाची मर्यादा घालण्यात आली होती. नाईट ड्युटी विंडो रात्री 12.00 ते पहाटे 6.00 करण्यात आली होती. FDTL नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवली जाईल असं इंडिगोला वाटलं होतं. मात्र, डीजीसीएकडून मुदतवाढ देण्यात आली नाही. इंडिगोचं नेमकं इथंच चुकलं आणि मोठा गदारोळ झाला अखेर डीजीसीएला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागं घ्यावा लागला. 

एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात पायलटला आवश्यक सुट्टी देण्यात आली होती. एअरबस A320 च्या सॉफ्टवेअर अपडेशन मुळं वीकेंड लांबला, विमानाची उड्डाणं लांबली. उशिरा उड्डाण झाल्यानं अनेक पायलटची ड्यूटी नाईट विंडोमध्ये गेली. त्यामुळं सोमवारी एफडीटीएल लागू झाल्यानं क्रू मेंबर्स ऑटोमेटिक अनिवार्य रेस्टवर गेले. मोठ्या संख्येनं क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यानं इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं. विंटर शेड्यूल 26 ऑक्टोबरपासून वाढल्यानं फ्लाइटसची संख्या वाढली, यामुळं अडचणी वाढल्या. 

इंडिगोनंकडून 2200 फ्लाईट एका दिवसात चालवल्या जातात, एअर इंडियाच्या ही दुप्पट संख्या आहे.  नियोजनातील त्रुटींमुळं मोठी समस्या निर्माण झाली. 10 टक्के फ्लाईट रद्द कराव्या लागल्या तरी ती संख्या 200-400 फ्लाईट रद्द होतात, ज्यामुळं प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास करावा लागतोय. 

दिल्लीतील 135 उड्डाणं आणि 90 लँडिंग रद्द करण्यात आली आहेत. बंगळुरुत 52 लँडिंग आणि 50 उड्डाणं रद्द करण्यात आली. गेल्या 48 तासात 600 हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 

डीजीसीएकडून इंडिगोला दिलासा

डीजीसीएनं 1 नोव्हेंबरपासून जी एफडीटीएळ नियमावली लागू करण्यात आली होती मात्र सध्याची स्थिती पाहता साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागं घेण्यात असल्याचं जाहीर केलं. इंडिगोनं पुढील 48 तासात सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल असं सांगण्यात आली आहे. इंडिगोच्या टीम चोवीस तास काम करत असून प्रवाशांची गैरसोय रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, असं इंडिगोनं सांगितलं.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget