एक्स्प्लोर

बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार

इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात अचानक वाढ केली. त्यानुसार, पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट 61 हजार रुपयांवर पोहोचले आहे.

पुणे : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची (Airport) अवस्था बस स्टँडसारखी झाली असून प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळावर पाहायला मिळत आहे. इंडिगाने पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली आहे. मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे (pune), मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असून या विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास (Passenger) करण्यासाठी तब्बल 61 हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे, प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.  

इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात अचानक वाढ केली. त्यानुसार, पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट 61 हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट 27 हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी 49 हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईहून लंडनला जाण्यासाठी किमान प्रिमियम इकॉनॉमीचे तिकीट 50 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30 हजार रुपयांपर्यंत विमान भाडे आकारले जाते. मात्र, इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क 61 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 

सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपट दराने विकली जात आहेत. देशभरातून इंडिगोची तब्बल 600 हून अधिक विमाने आज रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री 11.59 वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असे पत्रच कंपनीने जारी केले आहे. दरम्यान, रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या गेल्या दिवसांपेक्षाही जास्त असल्याने प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे, प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

इंडिगोकडून प्रवाशांची माफी

दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी (DEL) निघणाऱ्या सर्व इंडिगो देशांतर्गत विमानांची उड्डाणे रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित निर्णयाचा गंभीर फटका बसलेल्या आमच्या सर्व मौल्यवान प्रवासी, ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो, असे इंडिगोने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

हेही वाचा

प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Nabin BJP: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होताच नितीन नबीन यांचे पहिले निर्णय; विनोद तावडे, आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावला
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Kalyan Dombivli Mahangarpalika Election 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
कल्याण-डोंबिवलीत चक्रावणारं राजकारण, ठाकरेंचे दोन नगरसेवक गायब, दोन जण मनसेच्या गोटात
Embed widget