एक्स्प्लोर

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेचा दाखल देत लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या तिसऱ्या टर्ममधील कामकाजाला एक वर्ष झालं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री (CM) आज नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, मागच्यावर्षी आजच्या दिवशी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि 232 जागा आम्हाला मिळाल्या, या एक वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेचा दाखल देत लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल, असे त्यांनी म्हटले होते. चव्हाण यांच्या या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून 2019 ला देखील मोदीच पंतप्रधान असतील, असे त्यांनी म्हटले.  

मोदीचं आरोग्य उत्तम, 40 वर्षाच्या व्यक्तीलाही लाजवेल

पृथ्वीराज बाबांना अशी स्वप्न पडत असतात, एक लक्षात ठेवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत. देशांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत, असे कोणीही करू शकत नाही. मोदींचे आरोग्य उत्तम आहे, 40 वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशाप्रकारचे आहे. त्यामुळे, 2029 ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

एक वर्षाचा काळ समाधानी, अजून काम बाकी

आम्ही विकासाची कामे आणि लोकयोजना यामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा योजना असेल, त्यातच आज आम्ही विश्वविक्रम केला आहे. एका महिन्यात 46,911 सौर पंप लावून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलो आहे. देशात नऊ लाख पंप लागले असून, त्यातील सात लाख पंप महाराष्ट्राने लावले आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे आणि मोफत वीज मिळत आहे. कृषी संजीवनी वाहिनी योजना पुढच्या वर्षी पूर्ण करू, त्यामुळे महाराष्ट्र पहिलं राज्य असेल जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मला झोप या करिता येत नाही कारण हे काम करायचे राहिले ते काम करायचे राहिले आहे. एक वर्षाचा काळ खूप मोठा काळ होत नाही, एक उत्सुकता आहे आणि भावना आहे की अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या करू, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

हेही वाचा

बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget