एक्स्प्लोर
प्रेमभंगातून तरुणाची आत्महत्या, 15 पानी पत्र सापडलं
प्रेमात आलेल्या अपयशामुळे पुण्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार असं 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अक्षय मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता.
पुणे : प्रेमात आलेल्या अपयशामुळे पुण्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षय अखिलेश्वर कुमार असं 22 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अक्षय मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता. पुण्यातील हडपसर परिसरातील अमनोरा पार्क परिसरातील ही घटना आहे.
प्रेमभंगातून आलेल्या नैराश्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. अक्षयने आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साहाय्याने फॅनला लटकून आत्महत्या केली.
अक्षयने तब्बल पंधरा पानांचे पत्र लिहून त्याच्या खोलीमधील फ्रिजवर ठेवले होते. या पत्राच्या माध्यामातून आई, वडील आणि भावाची अक्षयने माफी मागितली आहे. अक्षय मगरपट्टा येथील आयबीएस कॉलेजमधील व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षण घेत होता. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement