मुळशीत खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदारकार्ड काढण्याचा प्रयत्न, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![मुळशीत खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदारकार्ड काढण्याचा प्रयत्न, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल Voting vard fake documents mulshi pune marathi news update मुळशीत खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदारकार्ड काढण्याचा प्रयत्न, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/12/ba01179f0de88aaa835db54304a8b8521683882757954379_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्राच्याआधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकाऱ्याने केली आहे. तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 203 भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट व यादी भाग क्र. 204 मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र.6 दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. याबाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली, असता विद्युत देयकांवरील नाव व पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद व महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणचा सुधारित कार्यक्रम घोषित
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी ऐवजी 22 जानेवारी 2024 रोजी होणार असून त्यासाठीचा सुधारित कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात छायाचित्र समान नोंदी, भौगोलिकदृष्ट्या समान नोंदी घेणे आणि अर्ज प्रलंबित असल्याने भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रमात सुधारणा करण्यात आली आहे.
पुनरीक्षण उपक्रमाअंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याच्या सध्याची तारीख 26 डिसेंबर 2023 ऐवजी 12 जानेवारी 2024 करणन्यात आली आहे. मतदार यादीचे मानांकन तपासणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, अभिलेख अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याची तारीख 1 जानेवारी 2024 ऐवजी 17 जानेवारी 2024 करण्यात आली आहे. मतदार यादी अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी ऐवजी 22 जानेवारी 2024 रोजी होईल, अशी माहिती उप जिल्हाधिकारी मिनल कळसकर यांनी दिली आहे.
दुबार नाव नोंदणी व समान छायाचित्राबाबत दुरूस्ती करुन घेण्याचे आवाहन
निवडणूक आयोगाने विविध माध्यमातून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे. पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे 28 हजार तर समान छायाचित्राचे 1 लाख 42 हजार 349 मतदार आहेत. संबंधितांनी त्यांना मिळालेल्या नोटीशीवरील पर्याय निवडून 1 जानेवारी 2024 पर्यंत दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)