एक्स्प्लोर

Sushma Andhare: सुषमा अंधारेंनी आता जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याचंही नाव घेतलं, PI शशिकांत चव्हाणांकडे थार गाडीतून गेलेल्या चोंधेची केस!

Sushma Andhare: वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना मदत करणारा, थार गाडी दिमतीला देणारे चोंधे बंधु यांच्याशी संबंधित मोठी माहिती आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये फक्त हगवणे परिवारच नाही तर त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार देखील त्यांना साथ देत असल्याचं समोर आलं. वैष्णवीच्या नणंदेचा मित्र निलेश चव्हाण हा घरातील वादात किंवा इतर गोष्टींमध्ये असायचा तर, बाहेरच्यांना धमकावण्यासाठी हगवणे परिवार त्यांचा मामा जालिंदप सुपेकर यांच्या नावाचा वापर करायचा आणि धमक्या द्यायचा असं समोर आलं आहे, त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना मदत करणारा, थार गाडी दिमतीला देणारे चोंधे बंधु यांच्याशी संबंधित मोठी माहिती आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप

सुषमा अंधारे यांच्यासह मविआच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी सांगितलं की, या भेटीमध्ये चाकणकर हा व्यक्तीगत पातळीवरचा विषय नव्हता, त्याचबरोबर इतका छोटा विषय घेऊन राज्यापालांना भेटण्याचं काहीही कारण नाही. जे मुद्दे आम्ही आज या चर्चेवेळी मांडलेले होते. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पहिला मुद्दा वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप आहे. हगवणे केसमधील ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो, आणि त्यांचं पदावनती झाली, त्या जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस स्टेशनला पीआय आहेत. शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंधेच्या थार गाडी घेऊन गेले  होते, त्या चोंधेंच्या दोन सुनांच्या केसेस होत्या. याच शशिकांत चव्हाण यांच्या अरबो रूपयांच्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी साईट्स सुरू आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांची चौकशी करण्यात यावी, याबाबतची चर्चा आम्ही राज्यपालांसोबत केली, अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि त्यांचा मेव्हणा शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती यावेळी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे. 

राजेंद्र हगवणेला थार देणाऱ्या चोंधे कुटुंबाची कुंडली बाहेर 

सुयश चोंधेच्या पत्नीने धनश्री चोंधे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, नवरा सुयश चोंधे याच्यासह घरातील सर्वांनी छळ केला. त्यांनी पैशांसाठी मानसिक, शारिरीक छळ केला आहे. माहेरून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देत होते. मुलगी झाली म्हणून देखील त्यांनी त्रास दिला होता.  मुलगी झाली तेव्हापासून सासरच्यांनी काहीही तिचं पाहिलं नाही. माझ्या माहेरून तीचं शिक्षण आणि बाकी खर्च केला जातोय. सुयश चोंधेच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीनंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. राजेंद्र हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्री संबंध आहेत. मी नोव्हेंबरपासून माझ्या माहेरी आहे. त्यामुळे मला तिकडची आत्ताची जास्त माहिती नाही. पण, हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्रीसंबंध आहेत, अशी माहिती सुयश चोंधेच्या पत्नीने दिले आहेत.

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Pune Crime News: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं
NEET UG paper leak RCC class Motegaonkar Sir: डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणाऱ्या फॅक्टरीचा मालक, वर्षाला कोचिंग क्लासचा 100 कोटींचा टर्नओव्हर, आता NEET पेपरफुटीप्रकरणी अटक, कोण आहेत प्रोफेसर शिवराज मोटेगावकर?
डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणाऱ्या फॅक्टरीचा मालक, वर्षाला कोचिंग क्लासचा 100 कोटींचा टर्नओव्हर, आता NEET पेपरफुटीप्रकरणी अटक, कोण आहेत प्रोफेसर शिवराज मोटेगावकर?
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी
ब्युटी पार्लर चालक मनीषाकडे 8 दिवस आधीच NEET पेपर; सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे, A टू Z स्टोरी

व्हिडीओ

Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल
Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Gold Price: आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
आयात शुल्क वाढताच सोन्याचे भाव गगनाला भिडले; तुम्हाला घरात बिलाशिवाय सोन्याचे किती दागिने बाळगता येणार?
Gold Import: सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
सोन्याच्या खरेदीबाबत मोठी बातमी, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर 10 पैकी 6 लोकांनी बदलला आपला निर्णय, सर्व्हेमधून माहिती समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
लातूरमधील कोचिंग क्लासेसवाल्या शिवराज मोटेगावकरच्या अटकेची कारणे; सीबीआयच्या तपासात काय घडलं?
Embed widget