Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. या रॅकेटबाबत सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर अनेकांची तोंड बंद होईल, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील हाताला लागला (Sasoon Hospital Drug Racket) आहे. त्याच्यामार्फत मोठं रॅकेट बाहेर येईल. या प्रकरणात सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. कोणालाही सोडणार नाही. या रॅकेटबाबत सगळ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर अनेकांची तोंड बंद होईल, अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ड्रग्ज फ्री महाराष्ट्र संकल्पना घेऊन जी परिषद झाली तेव्हा सगळ्यांना सांगण्यात आले होते की ड्रग्ज रॅकेट विरोधी हा उपक्रम घ्या आणि सगळे युनिट्स कामाला लागले आहेत. मुंबई पोलिसांना देखील नाशिकची माहिती मिळाली आणि धाड टाकली होती. आता ललित पाटील ललित पाटील हातामध्ये आला आहे आणि मोठे जाळे बाहेर येईल. एक मोठा नेक्सस आता समोर आला आहे, असंही ते म्हणाले.























