एक्स्प्लोर
पिंपरीत भुताची अफवा, यूपीतील मांत्रिकाला पाचारण
महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहात भूत असल्याचं आणि ते भूत पळवून लावण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र केल्याचंही समोर आलंय.

पिंपरी चिंचवड : सुसंस्कृत शहरात गणल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये अंधश्रद्धेचा कळस गाठला गेला. महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहात भूत असल्याचं आणि ते भूत पळवून लावण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र केल्याचंही समोर आलं. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ही पूजा-अर्चा करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशवरुन मांत्रिकाला पाचारण करण्यात आलं होतं. अत्रे सभागृहाच्या नूतनीकरणाचं काम सुरु आहे. तिथल्या कामगारांना एका महिलेच्या बांगड्यांचा आवाज येत होता, तसेच ती महिला त्यांना 'इकडे ये' असं म्हणायची. तर तिच्यासोबत असणारा एक पुरुष दगड मारायचा. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचं कामगार सांगतात. शेवटी या कामगारांनी मांत्रिकाला बोलावून तीन दिवसांपूर्वी तंत्र-मंत्र केले. मात्र त्यांची भीती कायम असल्याने आता हे कामगार सायंकाळी सहानंतर काम बंद करतात. अंधश्रद्धेचा हा कळस गाठला गेला असताना महापालिका मात्र डोळे झाकून गप्प होती, तर आता याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. संबंधित बातम्या :
दीनानाथ रुग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलावलं, महिलेचा मृत्यू
पुण्यात मांत्रिकाकडून महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
आणखी वाचा























