एक्स्प्लोर

Alandi : रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली, छत्रपती संभाजीनगरचा इरफान शेख दुसरा 

Ringan Vaktrutwa Spardha Alandi : आळंदी येथे पार पडलेल्या रिंगण वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एबीपीचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं.

पुणे : रिंगण वक्तृत्व स्पर्धा या संतविचारांवर आधारित महाराष्ट्रातल्या पहिल्या आणि एकमेव वक्तृत्व स्पर्धेत यंदा नाशिकची श्रुती बोरस्ते हिने 11 हजार रुपये रोख रकमेचं पहिलं पारितोषिक पटकावलं. तर छत्रपती संभाजीनगरचा इरफान शेख दुसरा आला. रविवारी आळंदी येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून आलेल्या 69 स्पर्धकांनी भाग घेतला. 

राज्यभरातल्या अनेक जुन्या आणि नामवंत वक्तृत्व स्पर्धा बंद होत असताना रिंगण वक्तृत्व स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अत्यंत सुखद आहे असं एबीपी माझाचे ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांनी बक्षीस वितरण समारंभात सांगितलं. राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. 

स्पर्धेचं हे तिसरं वर्षं असून दर आषाढी एकादशीला प्रकाशित होणाऱ्या वार्षिक रिंगणने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या मदतीने याचं आयोजन केलं होतं. मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे कार्यक्रमाला उपस्थित होते. 

वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांना टीव्ही पत्रकारितेत मोठी संधी असल्याचेही खांडेकर यांनी सांगितलं. तर उत्तम वक्तृत्वाचा उपयोग संतविचारांच्या प्रसारासाठी करा, तुमच्या उपजिविकेची काळजी समाज घेईल, असं आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांनी उद्घाटन प्रसंगी केलं. नाशिक येथील साहित्यिक नंदन रहाणे आणि छत्रपती संभाजीनगरहून आलेले पत्रकार-व्याख्याते नीलेश चव्हाण यांनी परीक्षक म्हणून काम बघितलं. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा, 

पहिला क्रमांक - रुपये 11 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 
श्रुती बोरस्ते (नाशिक
विषय- भक्ती तीच जी धर्माची कुंपण उद्ध्वस्त करते,  

दुसरा क्रमांक – रुपये 9 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 
इरफान शेख (छत्रपती संभाजीनगर)
विषय- संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही 

तिसरा क्रमांक – रुपये 7 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 
यश पाटील (मुंबई)
विषय - अवघा रंग एक व्हावा

चौथा क्रमांक – रुपये 5 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 
पराग बदिरके (महाड - रायगड)
विषय - बंडखोर शिष्य: संत परिसा भागवत

पाचवा क्रमांक – रुपये 3 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 
तेजस पाटील (कोल्हापूर)
विषय - 'जातीभेदाच्या आजारावर संतविचारांचं प्रिस्क्रिप्शन

उत्तेजनार्थ पारितोषिकं - रुपये 2 हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र 
अभय आळशी, आदित्य देशमुख, अमोल गोळे

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget