Rajesh Deshmukh Pune News: पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांना कोरोनाची लागण
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या विळख्यातून पुणे शहराला वाचवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.
Rajesh Deshmukh Pune News: पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या विळख्यातून पुणे शहराला वाचवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाकाळात पहिल्या दिवसापासून राजेश देशमुख हे जनतेच्या सेवेसाठी तत्पर होते. पुण्याची रुग्णसंख्या रोखण्यासाठी योग्यवेळी योग्य नियोजन करत त्यांनी पुणेकरांना कोरोनाच्या विखळ्यातून बाहेर काढलं होतं. अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली होती. अजित पवार आणि राजेश देशमुखांच्या बैठका सुरु असायच्या, अशी माहिती आहे.
काल (1 जुलै) राज्यात 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती. तर एकूण 4189 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. काल नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत काल सर्वाधिक म्हणजे 978 रुग्णांची भर पडली आहे.
देशात कोरोनाचा सतत फैलाव
देशात कोरोना विषाणूचा फैलाव थांबताना दिसत नाहीय. कोरोना संसर्गाचा आलेख वाढतानाच दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढून एक लाखांच्या पुढे पोहोचली आहे. ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 819 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशात सध्या 1 लाख 4 हजार 555 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 555 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे 14 हजार 506 नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 30 जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे पोहोचली आहे.