एक्स्प्लोर
Advertisement
ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे
नीट परीक्षेवरुन सरकार गोंधळ निर्माण करतंय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
पुणे: ‘नीट’ परीक्षेसाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळावं. इतर राज्यांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
नीट परीक्षेवरुन सरकार गोंधळ निर्माण करतंय, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.
ही धमकी समजा
राज ठाकरे म्हणाले, “नीट संदर्भात पालक आणि विद्यार्थी भेटले. नीटमध्ये महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य मिळणार आहे का नाही? इतर राज्यांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते, तसा नियम आहे. राज्य सरकारने बाहेरच्या राज्यांतील मुलं ‘नीट’च्या माध्यमातून भरली, तर आमचं त्याकडे लक्ष राहील. ही धमकी समजायची असेल तर समजा.
दूध आंदोलनाला सरकार जबाबदार
बाहेरच्या राज्यांमधील अमूल वगैरे दूध उत्पादकांना महाराष्ट्रात घुसवणं सुरुच आहे. कारण महाराष्ट्र सरकारचा कारभार केंद्र सरकारकडून चालवला जातोय. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव मिळाला पाहिजे. राज्य सरकारमधील लोक सांगकामे आहेत., असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
दूध आंदोलनाला सरकार जबाबदार आहे. सरकारकडून आधी बैठक बोलायला हवी होती, असं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपतींची स्मारकं, गडकिल्ल्यांवर खर्च करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून विधानसभेत गदारोळ केला जातो. मी त्यावेळी देखील पुतळ्याला विरोध केला होता. आज अरबी समुद्रात पुतळा उभारायचा झाल्यास दहा हजार कोटी रुपये खर्च येईल. आधी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं आणि किल्ल्यांवर खर्च करायला हवा, असं राज यांनी नमूद केलं.
निवडणूक म्हणून राम मंदिर नको
राम मंदिर झालं पाहिजे, पण तो निवडणुकीचा विषय म्हणून नव्हे ही आमची भूमिका आहे. चार वर्षांमध्ये काहीच काम झालं नाही, त्यामुळे भगवत गीता वाटणं किंवा राममंदिर वगैरे विषय सुरु आहे, असा आरोप राज यांनी केला.
वल्लभभाईंचे संदर्भ समजल्यास संघाच्या अंगलट
वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याबाबत कोणी बोलत नाही. वल्लभभाई पटेलांनी आरएसएसबद्दल काय म्हटलंय याचे संदर्भ मला मिळत आहेत. ते उघड झाले तर यांच्या अंगलट येईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
राजकारण
क्राईम
Advertisement