एक्स्प्लोर
पुण्यात कॅनॉलच्या पाण्यात बुडून चिमुरड्या भावंडांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील घोरपडी परिसरातील बीटी कवडे कॅनॉलमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
10 वर्षांचा कृष्णा बाळू धांडे आणि 8 वर्षांची लक्ष्मी धांडे या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. या दोघांचे आई-वडील मजुरीचं काम करतात. काल संध्याकाळी चिमुकल्यांच्या पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर आज सकाळी या दोघांचे मृतदेह खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यात आढळून आले.
लक्ष्मी आणि कृष्णा दोघंही कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्याचवेळी दौंडसाठी पाणी सोडण्यात आलं. अचानक वाढलेल्या पाण्याचा या चिमुरड्यांना अंदाज आला नाही आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला अशी माहिती आहे.
कॅनॉल शेजारी राहणाऱ्या गावांना वस्त्यांवर पाणी सोडण्याची पूर्वसूचना प्रशासनाने दिली होती का, असा सवाल आता विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement