Pune : सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला राज्य सरकारची परवानगी
पुण्यात होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला राज्य सरकारची परवानगी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता रसिकांना उत्सुकता आहे ती सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला परवानगी द्या, अशी महोत्सवाच्या आयोजकांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार आता सवाई गंधर्व संगीत महोत्सव सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
पुणे जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे शहरात मैदानात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, अशी पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांची इच्छा होती. "इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत असताना सवाई गंधर्व संगीत महोत्सवालादेखील ती मिळावी. सर्व नियमांचे पालन करून आपण त्याचे आयोजन करू", असे श्रीनिवास जोशी म्हणाले होते.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला आता परवानगी मिळाल्याने श्रीनिवास जोशी म्हणाले,"भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आमच्यासाठी हा निर्णय विशेष महत्वाचा आहे. यातील अटी - शर्तींचा अभ्यास करून लवकरच आम्ही सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाविषयी निर्णय घेणार आहोत".
अजित पवारांनी आज सवाई गंधर्व संगीत महोत्सव भरवण्यास राज्य सरकारची परवानगी असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर एक डिसेंबर पासून नाट्य आणि चित्रपट गृहांमधे प्रेक्षक संख्येचे कोणतेही बंधन असणार नाही. म्हणजेच शंभर टक्के क्षमतेने सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश देता येईल, असंदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या
Mile Sur Mera Tumhara : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त रेल्वे मंत्रालयाचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’
Kadambini Ganguly : देशातील पहिल्या महिला डॉक्टर कादंबिनी गांगुली यांची पुण्यतिथी; शेवटच्या श्वासापर्यंत महिला सबलीकरणासाठी कार्य
PHOTO : शत्रूला धडकी भरवणाऱ्या भारतीय लढाऊ विमानांचा 'एलिफंट वॉक' पाहिलाय का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha