एक्स्प्लोर
जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला
दम्याच्या उपचारासाठी 75 वर्षीय आरोपी डॉ. संतोष आवारी यांच्याकडे जात होते. मात्र डॉक्टरांनी आपल्याकडून जास्तीचं बिल घेतल्याचा संशय वृद्धाला होता.
![जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला Pune Senior Citizen Attacks Doctor With Knife Latest Update जास्त बिल घेतल्याचा संशय, पुण्यात वृद्धाचा डॉक्टरवर चाकूहल्ला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19122456/Pune-Patient-Knife-attack-Doctor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : क्षुल्लक वादातून पारा चढल्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. डॉक्टरने बिल वाढवून लावल्याच्या संशयातून पुण्यात वृद्धाने डॉक्टरवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दम्याच्या उपचारासाठी 75 वर्षीय आरोपी डॉ. संतोष आवारी यांच्याकडे जात होते. मात्र डॉक्टरांनी आपल्याकडून जास्तीचं बिल घेतल्याचा संशय वृद्धाला होता. याच रागातून त्यांनी डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये डॉक्टरांच्या पोटाला आणि हाताला जखम झाली असून तीन टाके पडले आहेत. बीएचएम असलेले डॉ. आवारी हे पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेड फाटा परिसरात सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात प्रॅक्टिस करतात.
सोमवारी संध्याकाळी डॉक्टर तपासणी करतानाच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. चाकूहल्ल्याचा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे.
सोमवारी सकाळीच पुण्यातील बाणेरमध्ये चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने एकाची कुकरीचे वार करुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी डॉक्टरांवर चाकूहल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)