Pune : यंदाचा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान
Pune : पुण्यात होणारा 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव' येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करून महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली. हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होणार आहे.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर रसिकांना उत्सुकता होती ती सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला परवानगी द्या, अशी महोत्सवाच्या आयोजकांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्यानुसार आता सवाई गंधर्व संगीत महोत्सव सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यंदाचे वर्ष पंडित भीमसेन जोशींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांनी सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी साजरा व्हावा, अशी पंडितजींचे पुत्र श्रीनिवास जोशी यांची इच्छा होती. "इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत असताना सवाई गंधर्व संगीत महोत्सवालादेखील ती मिळावी. सर्व नियमांचे पालन करून आपण त्याचे आयोजन करू", असे श्रीनिवास जोशी म्हणाले होते.
संबंधित बातम्या
Pune : सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला राज्य सरकारची परवानगी
19th Pune International Film Festival: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बारा बाय बारा' आणि 'पोरगा मजेत' यांची बाजी
Mhada Paper Leak issue : 'घरातली वस्तू कधी मिळणार', म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha