एक्स्प्लोर
बलात्काराच्या आरोपीचा कोठडीतच गळफास
पुण्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत सबजेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.
पुणे: दरोडा आणि बलात्कारातील आरोपीने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनअंतर्गत सबजेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली.
सुलदास उर्फ कुक्या काळे असं आरोपीचं नाव होतं. मंचर पोलिसांनी त्याला अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेतलं होतं. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्याला घोडेगाव सबजेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याने संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुलदासने गेल्या वर्षी लांडेवाडी येथील घरात दरोडा टाकून 45 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. त्याला एका गुन्ह्यात अहमदनगर पोलिसांनी अटक केली होती. तो मूळचा श्रीगोंदा येथील रहिवासी होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement