एक्स्प्लोर

Pune News: 'कुंपणाने'च खाल्ले शेत! रांका ज्वेलर्सला लेखापालांनीच लुटले; एक कोटी रुपयांची केली फसवणूक

Pune Ranka Jewellers: पुण्यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत 10 सप्टेंबर 2020  ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

 पुणे : पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स (Pune Ranka Jewellers)  मधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच मालकाची फसवणूक केली आहे. रांका ज्वेलर्स पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध  फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनोळखी व्यक्तीच्या नावाने बील

पुण्यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत 10 सप्टेंबर 2020  ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर व्यवस्थापकांच्या नावाने बनावट सह्या केल्या. अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले. दोघांनी एक कोटीहून अधिक रक्कम काढली. दरम्यान, ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने नोकरी ही सोडून दिली

बनावट सही करून फसवणूक

हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापकांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली असता धनादेशावर देशपांडे नामक यांची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील हिशोब तपासला. त्या वेळी दोघांनी देशपांडे यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यानंतर देशपांडे यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

रविवार पेठेतील शाखेत घडली घटना

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. रांका ज्वेलर्सच्या एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे  पुणे शहरात रांका ज्वेलर्सच्या विविध भागात शाखा आहेत. ही घटना रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत घडली आहे.

 पुण्यातील 200 गुंतवणूकदारांना 300 कोटींचा गंडा

 एका इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवत 200 कर्जदारांची 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडारने अनेक लोकांची फसवणूक केली आहे.   तुमचे कर्ज मी घेतो असे सांगत त्यांच्या नावावर एकाच वेळी तीन - तीन बँकांमधील कर्ज काढले. हे पैसे त्याने त्याच्या अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरुपात ठेवण्यास सांगितले. अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. मात्र जेव्हा गुंतवणूकदार पैसे घेण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यालयाला कुलूप होतं. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यावर 16 जणांनी एकत्र येत पोलिसात धाव घेतली. प्राथमिक तपासा दरम्यान 200 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून रक्कम ही 300 कोटीच्या जवळपास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे मालक सेलवाकुमार नडार हा फेब्रुवारी पासून गायब आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
Embed widget