एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन

Sujay Vikhe Patil On Shirdi Prasadalaya : कोणीही एखादं स्टेटमेंट केलं तर त्या विरोधात प्रतिक्रिया येतात. पण शिर्डीतील नेमका विषय काय होता हे आता कळल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

अहिल्यानगर : शिर्डी संस्थानच्या मोफत जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीत जमा झालेत या माजी खासदार सुजय विखे वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र सुरुवातीला सुजय विखेंच्या वक्तव्यावर टीका करणारे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आता सुजय विखेंच्या वक्तव्याचं समर्थन केल्याचं दिसून येतंय. सुजय विखेंनी आपल्याशी चर्चा करून हा विषय समजावून सांगितला, आपला गैरसमज झाला असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. राज्यभरातील भिकारी शिर्डीत आणले जातात आणि त्यातील काही नशेखोर असल्याचं वक्तव्यही संजय शिरसाट यांनी केलं. 

संजय शिरसाट म्हणाले की, सुजय विखेंनी भिकाऱ्यांसबंधी जे वक्तव्य केलं त्याला मी सुरुवातीला विरोध केला. मात्र सुजय विखे यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर तो विषय स्पष्ट झाला. काही भिक्षेकरू हे शिर्डीत गाड्यांनी आणले जातात. त्यातील काही नशेखोर आहेत. ते व्हाईटनरची नशा करतात. अशा लोकांमुळे गुन्हेगारी वाढते आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. खरं तर पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवे.

नेमकं काय म्हणारे सुजय विखे?

शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी ते पैसे वापरावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी  केली. मात्र ही मागणी करतेवेळी सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. शिर्डी संस्थानच्या प्रसादालयात मोफत जेवण बंद करा, राज्यातील सगळे भिकारी मोफत जेवण्यासाठी शिर्डीत गोळा झालेत असं सुजय विखे म्हणाले. दरम्यान, सुजय विखेंच्या या वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली.

मोफत जेवणामुळे मोस्ट वाँटेड क्रिमिनल्स शिर्डीत 

आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगत सुजय विखेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले की, "मराठी भाषेमध्ये प्रत्येकजण वेगवेगळे अर्थ काढतो. मागील 3 वर्षांत शिर्डीतील 4000 हजार भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवलं आहे. भिकारी याचा अर्थ भिकारीच जे पोलिसांच्या अहवालात सांगितलं आहे. शिर्डी विधानसभेत मला माझ्या महिला-भगिनी सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. साई संस्थानला माझी पुन्हा एकदा विनंती आहे की संस्थांनाच्या प्रसादालयातील आकारलेल्या पैशाचा वापर विकासासाठी आणि शिक्षणासाठी व्हावा."

साई भक्तांना हिणवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोक, मोस्ट वाँटेड गुन्हेगार, जे साईभक्त नाहीत त्यांची वाढ होतेय. याचा त्रास ग्रामस्थांना होतोय असं सुजय विखे म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, 'पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ!'
शरद पवारांनी दिलेल्या 'त्या' कागदावर काय लिहलं होतं? छगन भुजबळांच्या गूढ वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Embed widget