Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Pune Rain Update: पुण्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची (Pune Rain Update) शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
पुणे: पुण्यात थंडीचा जोर कमी झाला असून शहरासह जिल्ह्यात घाटमाथा आणि परिसरात पुढील तीन दिवस मेघगर्जना, वादळी वारे, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस (Pune Rain Update) हजेरी लावण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसांमध्ये पुणेकरांना रेनकोट सोबत ठेवावा लागणार आहे, पुण्यात पुढील दोन दिवस पावसाची (Pune Rain Update) शक्यता आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची (Pune Rain Update) शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे, तर गेल्या चोवीस तासांमध्ये शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली आहे. पावसाची शक्यता वर्तवली जात असली तरी देखील हवेत गारवा जाणवत आहे.(Pune Rain Update)
शहरात पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर
शहरात पहाटेच्या सुमारास धुके पडत आहेत, तर दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण जाणवते. शहरातील कमाल व किमान तापमान काही प्रमाणात चढ उतार झाल्यामुळे सकाळी थंडी दुपारी काहीसा उकाडा जाणवत होता. आज (शुक्रवारी ता. 27) पुणे शहर, जिल्हा आणि घाट परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Pune Rain Update) पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवले आहे. तर राज्यातील नाशिक, धुळे,जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत पुढील चोवीस तासांत मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होईल, अशी शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे. जळगाव, अहिल्यानगर येथे गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Pune Rain Update)
चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर वीस जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण ओसरले आहे, तर राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर पुण्यासह वीस जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या (शुक्रवारी आणि शनिवारी) राज्यातील बहुतांश भागांना हे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे दोन दिवस पाऊस आणि थंडीचे वातावरण राहणार आहे. राज्याच्या काही भागात संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. (Pune Rain Update)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे दक्षिण भारतातून राज्यात बाष्पयुक्त वारे आले आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने थंडीची लाट आहे. त्या शीतलहरी हवेच्या वरच्या थरांतून खालच्या थरांतही येते आहेत. त्यामुळे थंड वार सुटत आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस राज्यात पाऊस आणि थंडी असे संमिश्र वातावरण शुक्रवार व शनिवारी (दि. 27 व 28) राहणार आहे. बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.