Pune Rain Live Updates: पुण्याच्या मावळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
शनिवारी संध्याकाळी पुण्याला पावसाने चांगलच झोडपून काढले. पुणे शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय.

Background
पुणे : आज (शनिवारी) संध्याकाळी पुण्याला पावसाने चांगलच झोडपून काढले. आधी पुण्यातील उत्तर भागातील धानोरी, लोहगाव, कळस या भागात पावसाला सुरुवात झाली. या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठलं. ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वहायला लागले. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरले आहे. संध्याकाळी सव्वा सहा वाजता मुसळधार पावसाचा हा रोख मग शहराकडे वळला आणि संपुर्ण पुण्यात जोरदार पाऊस पडला. शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र.हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आणि अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्यात. संध्याकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर ओसरला असुन रिमझिम पाऊस सुरु आहे.
पुण्याच्या मावळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ही तुफान पावसाने हजेरी लावली
पुण्याच्या मावळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ही तुफान पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ऊन होते. मात्र, दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली.
पुण्यात काल मुसळधार पाऊस, घरात-दुकानात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान
पुण्यातील धानोरी, लोहगाव, कळस या भागात जोरदार पाऊस झालाय. या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठलं . ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचा मोठा प्रवाह वाहायला लागला. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरलं. पुणे शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या.
























