(Source: Poll of Polls)
Pranav Karad : पुण्यातील तरुण नोकरीसाठी अमेरिकेत गेला अन् जहाजावरुन बेपत्ता झाला; 3 दिवसांपासून शोधाशोध सुरु, कंपनी माहिती देईना!
पुण्यातील प्रणव कराड (Pranav Karad) नावाचा तरुण अमेरिकेतून (Pune Crime News) बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता.
पुणे : पुण्यातील प्रणव कराड (Pranav Karad) हा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर कॅडेट म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी अचानकपणे त्याचा त्याच्या कुटुंबाशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाला. या घटनेने कराड कुटुंबीय चिंतेत आहे. प्रणव हा विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो अमेरिकेत गेला होता.
3 दिवसांपासून बेपत्ता
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा. गेल्या 3 दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे. प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे. गोपाळ कराड असं बेपत्ता तरुणाच्या वडिलांचं नाव आहे.
प्रणवच्या वडिलांची चिंतेच
प्रणवचे वडिल म्हणाले, माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाहीये. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमची शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, याबाबत कराड यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
कंपनी नीट माहिती पुरवत नाहीत; वडिलांचा आरोप
प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता. त्याची विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट या अमेरिकेतील कंपनीत त्याची निवड झाली होती. अमेरिकेत तो जॉईन होण्यासाठी गेला होता. कामदेखील सुरु झालं. मात्र परंतु 5 एप्रिल रोजी कंपनीकडून तो हरवल्याचा फोन आला. त्यानंतर या संदर्भात 6 एप्रिल रोजी मेल आला. मात्रकंपनीने काहीच माहिती दिली नाही शिवाय सहकाही आणि मित्रांचे मोबाईल नंबरदेखील दिले नाहीत. त्यामुळे पालक अजून चिंतेत आले आणि त्यांनी परराष्ट्र मंत्रालय, जहाजबांधनी मंत्रालयाशी संपर्क करा आणि मुलाचा शोध घ्या, अशी मागणी प्रणवच्या वडिलांनी केली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Ajit Pawar : मोदींशिवाय कोणताही पर्याय विरोधीपक्षात दिसत नाही; अजित पवार