Bhushi Dam Overflow: पुणेकरांनो वीकेंडसाठी तयार रहा! पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे भुशी डॅम 'ओव्हरफ्लो'
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं आहे. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली आणि 250 मिलिमिटर पावसाची नोंद लावली.
Bhushi Dam Overflow: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं आहे. धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली आणि 250 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रस्थान असलेलं भुशी धरण तुडुंब भरलं. पायऱ्यावरून ओसंडून वाहणारं धरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.
पावसाळा आला की पुणेकरांचे सहलीचे प्लॅन असतात त्यात लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात लोणावळ्याचं वातावरण आल्हाददायक असतं. लोणावळ्यात काल आतापर्यंतच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. काल हवामान खात्याकडून लोणावळ्यात 166 मीमी पावसाची नोंद झाली आहे तर लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झालं आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं भुशी डॅम ओव्हर फ्लो होण्याची पर्यटक वाट बघत असतात. त्यासोबतच पावसाळ्यात लोणावळ्यात फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. टायगर पॉईंट, ईको पॉईंट या स्थळावरही पर्यटक भेट देतात. महत्वाचं म्हणजे सगळ्या परिसरात धुक्याची चादर पसरलेली असते. सह्याद्रीच्या पर्वत रांगा बघण्यासाठी देखील अनेक पर्यटर हजेरी लावतात. लहान-मोठे धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करत असते.
पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचा माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. आठवडाभार पावसाचा जोर कायम असेल असा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. पुण्याजवळील घाट परिसरात आणि धरण परिसरात संततधार पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज (६ जुलै) ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अत्यंत मुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.