एक्स्प्लोर
60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, निगडीत 7 वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका
स्थानिक व्यायसायिक असलेल्या ओमच्या वडिलांना अपहरणकर्त्यांकडून तीन फोन कॉल आले होते. तिसऱ्या कॉलमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलाच्या बदल्यात 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
![60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, निगडीत 7 वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका Pune Kidnapped Nigdi Boy Rescued Within Three Days No Arrest Yet 60 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, निगडीत 7 वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/26130227/Om_Kharat_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : निगडीत तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सात वर्षांच्या मुलाची सोमवारी सुखरुप सुटका झालं. ओम संदीप खरात असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव असून पोलिसांनी त्याला कुटुंबीयांकडे सोपवलं.
ओम खरातच्या घराशेजारी असलेल्या गोदामात तो सापडला. महत्त्वाचं म्हणजे त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निगडीच्या पूर्णानगरमध्ये कारमधून आलेल्या अज्ञातांनी शनिवारी दुपारी ओमचं अपहरण केलं होतं. स्थानिक व्यायसायिक असलेल्या ओमच्या वडिलांना अपहरणकर्त्यांकडून तीन फोन कॉल आले होते. तिसऱ्या कॉलमध्ये अपहरणकर्त्यांनी मुलाच्या बदल्यात 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती, असं निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी सांगितलं.
ओमच्या सुटकेसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 400 पोलिस या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. पोलिस मोबाईल लोकेशनवरुन शोध घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ओमची सुटका करुन, तिथून पळ काढला. 50 तासांच्या शोधमोहीमेनंतर पोलिसांनी ओमची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी मला गाडीच्या डिक्कीत ठेवलं होतं, असं ओमने पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.
मुलाने तीन दिवसांपासून काहीच खालेलं नाही. पण आम्हाला सांगताना आनंद होतोय की, अपहरणकर्त्यांना एकही पैसा दिला नाही. आम्ही अजून त्यांना अटक केलेली नाही. यासंदर्भातील पुढील माहिती लवकरच देऊ, असं पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला म्हणाल्या.
दरम्यान, ओम खरातची सुटका झाल्याच्या आनंदात निगडीच्या एका बेकरी मालकाने खास त्याच्यासाठी केक आणला होता. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी स्वत: हातने ओमला केक भरवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)