एक्स्प्लोर

Pune Crime: मला शुभदाला ठार मारायचं नव्हतं; पुण्याच्या आयटी कंपनीतील तरुण पोलीस चौकशीत काय म्हणाला?

Pune IT girl Murder: पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची हत्या. मारेकऱ्याने सुऱ्याने तिच्यावर वार केले होते. यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.

पुणे: पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका बीपीओ कंपनीत (BPO Company) काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीला तिचा सहकारी असलेल्या कृष्णा कनौजा या तरुणाने ठार मारल्याची घटना नुकतीच घडली होती. कृष्णा कनौजा याने शुभदावर कंपनीच्या आवारातच चाकूने वार केले होते. यानंतर शुभदाला (Shubhada Kodare)  रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कृष्णा कनौजा याला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून चौकशी होत असताना कृष्णा कनौजा (Krishna Kanaujia) याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. (Pune Crime news)

शुभदा मी तिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलिस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते, असे कृष्णा कनौजा याने सांगितले. कृष्णा कनौजा याला न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले आहे. पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी केली जात असून त्यामधून या हत्याप्रकरणाचा संपूर्ण तपशील समोर येत आहे.

शुभदा कोदारे हिने आर्थिक अडचण असताना अनेकदा कृष्णाकडून पैसे घेतले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कृष्णाने  शुभदाला तब्बल चार लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती. मात्र, कृष्णाला डोळ्याची शस्त्रक्रिया करायची असल्याने तो शुभदाकडे सतत पैशांची मागणी करीत होता; पण शुभदा पैसे परत देत नव्हती. त्यामुळे कृष्णा आणि शुभदा यांच्यात कामाच्या ठिकाणी वादही झाला होता. शुभदा कोदारे हिने सहकारनगर पोलिस ठाण्यात कृष्णाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यामुळे कृष्णा हा शुभदावर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी शुभदा कामाला येण्यासाठी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर पाच वार केले. हल्ल्यात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली आहे.

आणखी वाचा

 बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर

खोटं बोलणं जिव्हारी लागलं! समोरासमोर येताच कृष्णाने शुभदाला स्माईल दिली अन्...,पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7AM Headlines 24 March 2024ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 24 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special ReportNagpur Clash Ground Report :संचारबंदी हटली, बंदोबस्त कायम; नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
मोठी बातमी: नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार? कुटुंबीयांना नोटीस धाडली
Kunal Kamra & Eknath Shinde: कुणाल कामराची शिंदे साहेबांवरील टीका जिव्हारी लागली, स्टुडिओ फोडला, मुंबई पोलिसांची शिवसैनिकांविरोधात मोठी कारवाई, दोन नेत्यांना चौकशीलाही बोलावलं
कुणाल कामराचा शो झालेला स्टुडिओ फोडणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई, पोलिसांनी 'त्या' दोन नेत्यांना चौकशीला बोलावलं
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
'दोन दिवसांत माफी मागा, नाहीतर थोबाड काळं करू...'; कुणाल कामराविरोधात FIR, शिवसेना आमदाराचा थेट इशारा
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget