एक्स्प्लोर

Pune Crime: बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर

Pune news: शुभदाने वडिलांच्या उपचाराचे कारण सांगून कृष्णाकडून पैसे घेतले होते. शुभदा कोदारेने खोटे सांगितल्याचे समजताच कृष्णा संतापला त्याने कंपनीच्या पार्किंगमध्येच शुभदाची हत्या केली.

पुणे: पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीत नुकतीच एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. शुभदा कोदारे (Shubhada Kodare) असे या तरुणीचे नाव होते. तिच्यासोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28 वर्षे) या तरुणाने शुभदावर सुऱ्याने वार करुन तिला ठार मारले होते. या घटनेचा एक VIDEO सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयटी कंपनीतील (Pune IT Company) एका इमारतीच्या खिडकीतून हा VIDEO शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कृष्णा आणि शुभदा स्पष्टपणे दिसत नसले तरी शेवटच्या क्षणांमध्ये त्याठिकाणी काय घडले होते, हे पाहायला मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा कनोजा याने आर्थिक व्यवहारावरुन शुभदाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णाने शुभदाला तब्बल 4 लाख रुपये दिले होते. मात्र, तिने खोटे कारण सांगून हे पैसे घेतल्याचे समजताच कृष्णा संतापला होता. मंगळवारी शुभदा बसने कंपनीत आली त्यावेळी कृष्णा त्याठिकाणी होता. ने शुभदा जवळ येताच माझ्या पैशाचं तू काय केलंस, असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर कृष्णाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भल्यामोठ्या सुऱ्याने शुभदावर वार करायला सुरुवात केली. त्याने शुभदाच्या अंगावर  चार-पाच वार करुन तिला जखमी केले.

शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्याभोवती घिरट्या घालत होत्या. यावेळी आजुबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कृष्णाच्या हातातील भलामोठा सुरा पाहून कोणाची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. कृष्णाने वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली होती. अखेर कृष्णाने तिच्याजवळ जाऊन तिला खाली पाडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर कृष्णाने आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला. कृष्णाने सुरा फेकल्यानंतर आजुबाजूचे लोक त्याठिकाणी धावत आले आणि त्यांनी कृष्णाला मारायला सुरुवात केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. मात्र, हे सगळे घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातून बरेच रक्त वाहून गेले होते. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिने जीव सोडला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. यानिमित्ताने पुण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा

खोटं बोलणं जिव्हारी लागलं! समोरासमोर येताच कृष्णाने शुभदाला स्माईल दिली अन्...,पुण्यातील आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime: 24 तासात पुन्हा एका विवाहितेसह सहा मुली, एक युवक बेपत्ता; पोलीस विभागाकडून थातूरमातूर प्रेस नोट, बुलढाण्यात नेमकं काय घडतंय?
24 तासात पुन्हा एका विवाहितेसह सहा मुली, एक युवक बेपत्ता; पोलीस विभागाकडून थातूरमातूर प्रेस नोट, बुलढाण्यात नेमकं काय घडतंय?
Farooq Abdullah Attack: मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO
मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक
पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून 4 जणांना अटक

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget