Pune Bypoll election : कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांचं नाव जाहीर
Pune By election: पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना घोषित करण्यात आली आहे.
Pune Bypoll election : पुण्यातील कसबा मतदार संघाची उमेदवारी महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना घोषित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत ही उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी घोषित केल्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे यावरुन स्पष्ट झालं आहे.
ट्विटमध्ये काय लिहिलं आहे?
पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 6, 2023
कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.