PM Narendra Modi In Dehu: संतपरंपरेमुळे आज भारत एकजूट : नरेंद्र मोदी
भारतीय संतपरंपरेमुळे आज आपल्या जगण्याला दिशा मिळाली. आतापर्यंतच्या प्रत्येत कालखंडात अनेक संतांनी जन्म घेतला आणि समाजाचं जीवन समृद्ध करण्याचं काम केलं.
PM Narendra Modi In Dehu: भारतीय संतपरंपरेमुळे आज आपल्या जगण्याला दिशा मिळाली. आतापर्यंतच्या प्रत्येत कालखंडात अनेक संतांनी जन्म घेतला आणि समाजाचं जीवन समृद्ध करण्याचं काम केलं. संतांमुळे समाज एकवटला आणि कार्यशील झाला, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते देहूतील शिळामंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर वारकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते.
संतांची कृपा असली की ईश्वाराची कृपा होते. देहूच्या या पवित्र भूमिवर मला येण्याचं भाग्य मिळालं. संत तुकाराम महाराजांचं जन्म आणि कर्मस्थळ देहू आहे. काही दिवसांपुर्वी पालखी मार्गासाठी दोन महामार्गाचं चौपद्रीकरणाच्या भूमिपुजनाचं भाग्य लाभलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्या होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यात होईल. या सगळ्या टप्प्या 350 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते तयार होतील आणि यावर 11 हजार करोड रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीला गती मिळेल, असंही मोदी म्हणाले.
ज्या शिळेवर संत तुकारामांनी 13 दिवस तपस्या केली. जी शिळा बोध आणि ज्ञानाची साक्षीदार आहे. ती फक्त शिळा नाही तर ती भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. देहूचं शिळामंदिर हे भक्तीच्या शक्तीचं केंद्र नसून भारताच्या सांस्कृतिक भविष्याचं प्रतिक आहे, असं म्हणत त्यांनी वारकऱ्यांचं अभिनंदन केलं आणि आभार मानले. यावेळी देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आम्हाला गर्व आहे की आपण जगाच्या प्राचीन गोष्टींपैकी एक आहोत. या सगळ्याचं श्रेय भारताच्या ऋषीमुनींना आण संतपरंपरेला जातं. भारत संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात भारतात देशाला आणि समाजाला दिशा देणारे अनेक महान लोक जन्माला आले. याच महान संतांमुळे भारत आज गतीशील आहे, असंही ते म्हणाले.
संत तुकारामांना संत बहिणाबाईंनी संतांच्या मंदिराचा कळस म्हणून संबोधलं आहे. ते अनेक अडचणींना सामोरे गेले. ज्यावेळी अनेकांनी माघार घेतली त्यावेळी संत तुकाराम पुढे आले त्यांनी संघर्ष केला. संत तुकारामांची सेवा, दया आणि कामाची प्रचीती त्यांच्या अभंगातून येते. या अभंगांनी आपल्या पीढीला प्रेरणा दिली आहे. अनेकांना जगण्याची दिशा दिली आहे. जो भंग होत नाही वेळेनुसार प्रासंगिक राहतो त्याला अभंग असं संबोधित केलं आहे. आजही देश जेव्हा सांस्कृतिक मुल्यांवर पुढे जात आहे. यात संत तुकारामांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहे,अशा शब्दांत त्यांनी अभंगाचं महत्व सांगितलं.
संत नामदेव, एकनाथ, गोरोबा काका, संत चोखामेळा यांच्या अभंगामुळे कायम प्रेरणा मिळते. मानवांमध्ये भेदभाव न करण्याच्या त्यांचा संदेश फक्त भक्तीसाठी नाही तर राष्ट्र भक्ती आणि समाज भक्तीसाठी आहे. याच संदेशावरुन आपले वारकरी प्रत्येक वर्षी पंढरपूरची यात्रा करतात. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ बिना भेदभावाने मिळतो आहे. दलित, वंचित, आदिवासी, गरिब मजूर यांची सेवा ही देशाची पहिली जबाबदारी आहे. समाजाला गती देण्यासाठी संत मंडळींनी कायम पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील तुकाराम महाराजांनी महत्वाची भूमिका निभावली. सावकरांनी शिक्षा झाली तेव्हा ते देखील तुकारामांचे अभंग गात होते. प्रत्येक कालखंडात संतांची महिमा कायम राहिली आहे. भारताची प्रत्येक यात्रा एक भारत श्रेष्ठ भारताचा संदेश दिला आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.