एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PM Modi in Pune : पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, वर्षातून एकदा तरी...

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरी नागरिकांना आवाहन केले आहे. शहरी नागरिकांनी किमान वर्षातून एकदा नदी उत्सव साजरा करावा असे त्यांनी म्हटले.

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमात भाषण करताना शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे. शहरातील नागरिकांनी वर्षातून किमान एकदा नदी उत्सव साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्या अनुषंगाने त्यांनी नागरिकांना आवाहन केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, प्रदूषण आणि पुराला रोखण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. मुळा मुठाच्या प्रकल्पासाठी महापालिकेला केंद्र सरकारकडूनही मदतीचा हात देण्यात येत आहे. शहरातील नदी स्वच्छ झाल्यास, त्याचे सौंदर्यकरण झाल्यास त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. नदी पुन्हा जिवंत झाल्यास नागरिकांमध्ये एक नवचैतन्य, उत्साह निर्माण होईल. नदीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नागरिकांनी वर्षातील एक दिवस ठरवून नदी उत्सव साजरा करावा असे आग्रही आवाहन पंतप्रधानांनी केले. या महोत्सवात नदी प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करता येईल. त्याशिवाय नदी, पर्यावरणाचे महत्त्व आदीचे सांगता येईल. यानिमित्ताने जनजागृती मोहीम राबवता येईल असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की,  पुण्याची ओळख ग्रीन फ्यूल सेंटर म्हणून निर्माण होत आहे. परदेशातील कच्च्या तेलाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी म्हटले. 

समाजातील सर्वच घटकांनी विशेषत: श्रीमंतांनी मेट्रोतून प्रवास करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. मेट्रोतून प्रवास करणे शहराला एक प्रकारे मदत करण्यासारखे आहे. 21 व्या शतकातील शहरांच्या गरजा आणि विकास लक्षात घेऊन सरकार धोरण आखत आहे. सरकार अधिकाधिक ई-वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. अत्याधुनिक पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रियेची व्यवस्था, बायोगॅस प्लांट, स्मार्ट एलईडी बल्बचा अधिक वापर व्हावा यासाठीच्या धोरणांवर सरकारकडून काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवारSanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत पहिल्यांदाच शिंदे गटाच्या नेत्याचं जाहीर वक्तव्य, म्हणाले...
Rohit Sharma : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
Video : रोहित शर्माचा जलवा! मुंबईत ज्या घोषणांनी हार्दिक पांड्याला हैराण करून सोडलं, त्याच घोषणा रोहितसाठी ऑस्ट्रेलियात सुद्धा गरजल्या
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Embed widget