एक्स्प्लोर
पुण्यात एक कोटी रुपये पकडले, सर्व नोटा हजार, पाचशेच्या
पुणे : पुणे पोलिसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली.
1 कोटी 11 लाख 46 हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. पकडण्यात आलेली रक्कम आपण बदलण्यासाठी नेत होतो, असा दावा अंकेश अग्रवालने केला आहे. अंकेश अग्रवाल हा व्यवसायाने इस्टेट एजंट आहे.
अंकेश अग्रवालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून या प्रकाराची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.
दरम्यान नोटाबंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर अनेक ठिकाणी रोकड पकडण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement