एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड महापौरांच्या दालनावर चुलत भावाचा ताबा, महापौरांचे सत्कारही स्वतः स्वीकारले

Pimpri Chinchwad Mayor News : महापौर नसताना त्यांचे चुलत बंधू हे त्यांच्या दालनातून कामकाज पाहतात आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत असल्याचं दिसून येतंय. यावरून आता जोरदार चर्चा सुरू आहे. 

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या दालनाचा ताबा चुलत भाऊ प्रवीण लांडगे घेत असल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. महापौर मुंबई दौऱ्यावर असताना प्रवीण लांडगे यांनी दालनात येणाऱ्या पाहुण्यांकडून महापौरांचा सत्कारही स्वतः स्वीकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महापौरांच्या चुलत भावाला महापौरपदाचे अधिकार देण्यात आले आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबई दौरा आणि पालिकेत घडामोडी

महापौर रवी लांडगे हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यासह विविध मंत्र्यांच्या भेटी घेत शहर विकासासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. शहरासाठी निधी व प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

मात्र दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर दालनात प्रवीण लांडगे दिवसभर उपस्थित राहून कामकाज पाहत असल्याचे चित्र दिसले. महापौर नसताना आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकणे, अधिकाऱ्यांशी संवाद साधणे आणि कामांचा पाठपुरावा करणे ही भूमिका ते बजावत असल्याचे सांगितले जाते.

अधिकार की ‘अनौपचारिक जबाबदारी’? (Authority or Informal Role)

महापौरांनी काही कामांची जबाबदारी प्रवीण लांडगे यांच्यावर सोपवली असल्याचे बोलले जात असले, तरी त्यांच्या अनुपस्थितीत दालनाचा ताबा घेणे आणि सत्कार स्वीकारणे याबाबत अधिकृत आदेश आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. बुधवारी प्रवीण लांडगे यांनी महापौरांच्या स्वीय सहाय्यकांसोबत पालिका इमारतीत फेरफटका मारल्याचेही दिसून आले. ते कोणत्या अधिकाऱ्यांना भेटले, कोणत्या कामांचा पाठपुरावा करत होते आणि हे सर्व कोणत्या अधिकारवाणीने करत होते, याबाबत स्पष्टता नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

पालिकेत दबक्या आवाजात चर्चा (Political Buzz in Corporation)

महापौर रवी लांडगे पदावर आल्यानंतर एखादा दिवस वगळता प्रवीण लांडगे दालनात नियमित उपस्थित असल्याचे काही सदस्य सांगतात. त्यामुळे महापौर नसताना प्रवीण लांडगेच सूत्रे हातात घेतात का? अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात ऐकू येत आहे.

महापौरांच्या चुलत भावाचा हा उपक्रम महापौरांच्या संमतीने सुरू आहे की त्यांना याची कल्पनाच नाही, याबाबत अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी स्वतः महापौर रवी लांडगे काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ

Embed widget