एक्स्प्लोर

Hanumant Pawar : मोठी बातमी, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण, तुषार दामगुडेनं मारहाण केल्यानंतर महत्त्वाचा निर्णय

Hanumant Pawar : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. तुषार दामगुडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हनुमंत पवार यांना मारहाण केली होती. 

Hanumant Pawar पुणे : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिलं आहे. पुण्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामुगडे आणि त्याच्या साथीदारांनी हनुमंत पवार यांना पुण्यातील स्वारगेट परिसरात एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर मारहाण केली होती.  या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. एक गनमॅन पोलीस हनुमंत पवार यांच्यासोबत कायम असेल. 

हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे.  तुषार दामगुडे आणि साथीदारांनी  हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हनुमंत पवार यांच्या सोबत आता गनमॅन पोलीस तैनात असेल.   

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी तुषार दामगुडेला उत्तर देताना म्हटलं की काँग्रेसच्या विचारांचा पाईक असल्यानं प्रतिकार केला हिंसा केली नाही.  मी शेतीमधला माणूस आहे, हे मराठवाड्यातील लोकांना माहिती असेल. मी गाई-गुरे राखलेला माणूस आहे. आम्ही बैलाला कोपराने बुक्की देऊन खाली बसवायचो. मी दामगुडेला एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठू शकला नसता, असे हनुमंत पवार यांनी म्हटले. ते मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी काल हनुमंत पवार यांची भेट घेतली होती.  ही भेट पुण्यातील काँग्रेस भवन येथे झाली होती. 

23 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर तुषार दामगुडे आणि त्याच्या साथीदारांनी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केली होती. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शेअर करत कारवाईची मागणी केली होती. हनुमंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. तर, तुषार दामगुडे यांच्याकडील बंदूक जप्त करुन त्यांना सोडण्यात आलं होतं.   

दरम्यान, तुषार दामगुडे यांच्याकडून घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही खंत वाटत नसून जे केलं ते बरोबर केल्याचं सांगण्यात आलं आहे.   हनुमंत पवार यांना केलेल्या मारहाणीबाबत कोणताही पश्चाताप किंवा खंत वाटत नाही. मी जे केले ते योग्यच केले, असे मला वाटते. या प्रकारच्या  लोकांना कधी कधी ठाम आणि स्पष्ट शब्दांतच उत्तर द्यावे लागते. त्या ठिकाणी जे काही घडले, त्याबद्दल मला कोणतीही खंत नाही. हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्या पार्श्वभूमीवर त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे गरजेचे होते, असं तुषार दामगुडेनी म्हटलं.   

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav: संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप; अविनाश जाधवांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं प्रकरण काय?
संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळ्याचा आरोप; अविनाश जाधवांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Raj Thackeray : राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी किल्ले रायगडावर, अमित ठाकरेंना कुत्रा दिसताच आगतस्वागत सोडून प्रेमाने जवळ घेतलं बिस्कीट खाऊ घातलं
राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी किल्ले रायगडावर, अमित ठाकरेंना कुत्रा दिसताच आगतस्वागत सोडून प्रेमाने जवळ घेतलं बिस्कीट खाऊ घातलं
Embed widget