एक्स्प्लोर

पुण्यात चेक स्वीकारण्यास हॉस्पिटलचा नकार, अर्भकाचा मृत्यू

पुणे : पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळे एका नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागल्याचा दावा पालकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला रुबी हॉस्पिटलने केराची टोपली दाखवत चेक स्वीकारण्यास नकार दिला. तब्बल साडेतीन लाख एकरकमी रोख भरण्याची मागणी करत उपचार न केल्यामुळे आम्रपाली आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीनं प्राण सोडल्याचा आरोप आहे. पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला दोन दिवसांपूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र जन्मत:च या मुलीला हृदयाचा विकार होता. तिच्यावर तातडीनं शस्त्रक्रियेची गरज होती. त्यामुळे गौरव खुंटे बाळाला घेऊन शनिवारी पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला गेले. रुबी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना साडेतीन लाख रुपये कॅश भरण्यास सांगण्यात आलं. खुंटेंनी दीड लाख रुपयांची रक्कम रोख स्वरुपात भरण्याची तयारी दाखवली. यामध्ये काही हजार पाचशेच्या नोटांचा समावेश होता. बाकीचे पैसे चेक स्वरुपात भरण्याची तयारी दाखवली. पण हॉस्पिटल नकार देत कॅश पेमेंटवर अडून बसले. संध्याकाळी सहा वाजता बाळाची तब्येत बिघडली. तुम्ही खूप वेळ दवडल्यामुळे उशीर झाला, बाळाचे काही अवयव निकामी होत आहेत, असं सांगत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. तेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलेलं बाळ रविवारी पहाटे बाळ दगावलं. रुबी हॉस्पिटलच्या आडमुठेपणामुळेच आपल्या बाळाचा जीव गेल्याचा आरोप आता खुंटे दाम्पत्य करत आहे. गेल्या रविवारी 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास मुंबईतील जीवन ज्योत रुग्णालयाने नकार दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अशाचप्रकारे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत रुग्णालयात उपचारासाठी चेक स्वीकारावे असे आदेश दिले होते. पण तरीही काही रुग्णालये याला केराची टोपली दाखवत असल्याचे समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांचे आदेश काय? तातडीच्या उपचाराप्रसंगी सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून चेक स्वीकारावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अमंलबजावणी व्हावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबधित रुग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांक घ्यावा. जेणेकरून त्यांना चेक स्वीकारण्याबाबत मदत होईल. त्याचबरोबर एखादया रूग्णाने उपचार घेतलेल्या रूग्णालयास दहा हजार रुपयांपर्यंतचा दिलेला चेक न वटल्यास या चेकची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या

500च्या नोटा नाकारल्यानं अर्भकानं जीव गमावला, डॉक्टरांनी आरोप फेटाळले

तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

चेक बाऊन्स झाल्यास आम्ही 10 हजार देऊ : मुख्यमंत्री

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget