एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पार्किंगच्या वादातून पुण्यात अभियंत्याची दगडाने ठेचून हत्या
संगणक अभियंता नेवल भोमी बत्तीवालाने परदेशात संगणक अभियंता म्हणून काम केले होते. तो दोन वर्षापूर्वीच भारतात आला होता.
पुणे : केवळ घरासमोर गाडी पार्क करण्याच्या वादातून तिघांनी एका संगणक अभियंता असलेल्या तरुणाची लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना काल रात्रीच्या सुमारास लुल्लानगर परिसरात घडली.
कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. 39 वर्षीय नेवल भोमी बत्तीवाला असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी टुरिस्ट गाड्यांचा मालक यशवंत रासकर, याच्यासह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
टुरिस्ट गाड्या पार्क करण्यात येत असत. यावरुन पूर्वीही रासकर आणि नेवल यांच्यात वाद झाले होते. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे टुरिस्ट गाड्या पार्क करण्यासाठी चालक आले असता. त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
यावेळी नेवलने येथे गाड्या पार्क करु नका, असे त्या व्यक्तींना सांगितले. त्या ठिकाणी असणाऱ्या गाडी मालकाने आरटीओ अधिकारी असल्याचे सांगितले. त्यावर नेवलने ओळखपत्र मागितले. याचाच राग आल्याने त्या ठिकाणी असलेल्या तिघांनी आम्हाला ओळखपत्र मागणारा तू कोण? असे विचारत त्याला लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नेवलला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
नेवलने यापूर्वी परदेशात संगणक अभियंता म्हणून काम केले असून तो दोन वर्षापूर्वीच भारतात आला होता. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement