एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर दरड काढणार, वाहतूक काही काळ बंद

मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील आडोशी बोगद्याच्या परिसरातील दरड काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक काही काळ बंद राहील. आज आणि उद्या अर्थात बुधवार-गुरुवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर रोड ब्लॉक करण्यात येणार आहे. दुपारी बारा ते साडेतीन या दरम्यान काम सुरु राहिल. एक्स्प्रेस वे कधी बंद राहणार?
- दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान 15 मिनिटांसाठी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
- त्यानंतर 2 ते 3 च्या दरम्यान अर्ध्या तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
आणखी वाचा























