एक्स्प्लोर

Video: मग प्रशासनाला बोलवा ना खाली, अमोल कोल्हे चिडले; पोलिसांसोबत बाचाबाची, PMRDA कार्यालयाबाहेर गोंधळ

आशिया खंडातील सर्वात मोठी चाकण एमआयडीसी हद्दपार होत आहे. याचं सरकार आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही, अशी खंत ही एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

पुणे : मुंबईनंतर आता पुण्यातील (Pune) वाहतूक ही मोठी समस्या बनत असून सणावाराच्या दिवसांत येथे मोठी गर्दी होते. अगदी दोन ते तीन सात वाहनधारकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे, महत्त्वाच्या कामासाठी, सरकारी किंवा खासगी कामासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी कोंडी होते. त्यातूनच संताप व्यक्त करत आज पुण्यातील चाकणकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी सकाळी सहा वाजता पाहणी दौरा केलेल्या आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विश्वास ठेवलेल्या अजित पवारांवर आंदोलकांनी संताप व्यक्त केला. तर, पीएमआरडीए (PMRDA) कार्यालयाबाहेर खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही कोल्हेंच्या बाजुलाच उभे होते.

आशिया खंडातील सर्वात मोठी चाकण एमआयडीसी हद्दपार होत आहे. याचं सरकार आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही, अशी खंत ही एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. गुरुवार असल्यानं आज वाहतूक कोंडी नव्हती, व्हीआयपी मूव्हमेंटला ही मार्ग खुला करुन दिला जातो. मग एरवी पोलीस काय करतात? असा प्रश्न ही त्रासलेल्या आंदोलकांनी उपस्थित केला होता. अमोल कोल्हे अन् आढळराव पाटील यांच्या नेतृत्वात चाकणकरांचा मोठा मोर्चा पीएमआरडीए कार्यालयाच्या आवारात काढण्यात आला होता. या अमोल कोल्हे यांनी कार्यालयाच्या आवारात जाऊ देण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळली. मात्र, मोर्चेकरांची आग्रही मागणी लक्षात घेत खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळाला पीएमआरडीए कार्यलयात सोडण्यात आले. तत्पूर्वी कोल्हे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.

कुठला नियम लागतो, शांततेत आम्ही मोर्चा इथपर्यंत आणला आहे. आम्हाला कार्यालयातील परिसरात जाऊ द्या, कुठल्या नियमाने आम्हाला आडवता असे म्हणत अमोल कोल्हे यांनी पोलिसांसमोर आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. एकतर आम्हाला आतमध्ये जाऊ द्या, नाहीतर प्रशासनाला खाली बोलवा, अशाही तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्यानंतर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएच्या कार्यालयात खासदार, आमदार, मोर्चातील लोकप्रतिनिधी आणि शिष्टमंडळाला सोडण्यात आले. त्यावेळी, पोलिसांनी मोर्चेकरांना अडवून ठेवले होते.

अजित पवारांनी ताफ्याविना प्रवास करुन दाखवावा (Ajit pawar journey chakan)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा चाकणमधून विना ताफ्याचा प्रवास वाहतूक कोंडीतून करुन दाखवावा, असं आव्हान आंदोलनकर्त्यांनी थेट अजित दादांना दिलंय. चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढला. त्यावेळी, अजित पवारांच्या दौऱ्यावरुनही संताप व्यक्त केला.  

हेही वाचा

योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी अनिल परब इरेला पेटले, घायवळच्या रिव्हॉल्व्हर लायसन्सची क्रोनोलॉजी उलगडून सांगितली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: Parth Pawar जमीन व्यवहारात ४२ कोटींच्या दंडाची गरज नाही - Chandrashekhar Bawankule
Delhi Attack : Dr. Shaheen च्या भावाची ABP Network ला Exclusive माहिती, '4 वर्षांपासून संपर्क नाही'
Mahayuti Rift: 'भाजपला एकला चालवण्याची हौस आली आहे', Arjun Khotkar यांची जालन्यातून टीका
Faridabad Terror Arrest : लखनौमध्ये अटक झालेल्या डॉ. शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, यंत्रणा अलर्टवर
Sangli Uttam Mohite : सांगलीत वाढदिवशीच उत्तम मोहितेंची हत्या, थरारक CCTV फुटेज समोर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
Embed widget