एक्स्प्लोर
Advertisement
पुणे मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नसल्यानं महापौर उषा ढोरे नाराज
पुणे मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्यानं महापौर उषा ढोरे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. परिणामी पिंपरीत मेट्रो डब्यांच्या पूजनावेळी मानापमान नाट्य घडले.
पुणे : पिंपरीत मेट्रो डब्यांच्या पूजनावेळी मानापमान नाट्य पाहायला मिळाले. नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस आज पिंपरीत दाखल झाले. या मेट्रोच्या नावातच पिंपरीचा उल्लेख नसल्यानं पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे संतापल्या. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास मेट्रो चाचणी होऊ न देण्याचा महापौरांनी इशारा दिला आहे.
नागपूरहून पुणे मेट्रोचे कोचेस आज पिंपरीत दाखल झाले. त्यावेळी कोचेसवरील कागद न हटवताच महापौर उषा ढोरे यांना पूजन करायला सांगितले. मात्र, याबाबत महापौरांना कोणतीच कल्पना नसल्यानं त्यांचा गोंधळ उडाला. सोबतच मेट्रोच्या नावात पिंपरीचा उल्लेख नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मेट्रो प्रशासनानं समाधानकारक उत्तरं दिली नाही, तर मेट्रोची चाचणीच होऊ देणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला आहे. या सर्व प्रकारात महापौरांना तासभर ताटकळत उभं राहावं लागलं, त्यामुळे त्या चांगल्याच संतापल्या.
पुणेकरांची प्रतीक्षा संपणार -
पुणेकर आतूरतेने प्रतीक्षा करत असलेली पुणे मेट्रो लवकरच सुरु होणार आहे. कारण, नागपूरहून पुणे मेट्रोचे डबे आज पिंपरीत दाखल झालेत. त्याअगोदर पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 27 डिसेंबरला सह्याद्री अतिथिगृहात केले. त्यामुळे आता लवकरच पुणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होणार आहे. दरम्यान, पुणे मेट्रोचे काम सध्या वेगात सुरू असून या मेट्रोची आता प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. नागपूर येथून मेट्रोच्या कोचचे आगमन झाले आहे. या मेट्रोची प्रत्येक गाडी ही तीन कोचची असून एका गाडीतून 950 ते 970 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात.
तीन कोचपैकी एक कोच महिलांसाठी राखीव असून तीनही कोच आतून एकमेकांना जोडलेले असल्यामुळे प्रवाशांना सहज एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाणे शक्य होणार आहे. स्टेनलेस स्टीलने बनवलेले हे कोच वजनाला हलके असून यामध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. बाहेरील प्रकाशानुसार या दिव्यांची तीव्रता कमी-अधिक करणारी यंत्रणाही यात बसवण्यात आली आहे. ताशी कमाल 90 किमी वेगाने धावू शकणाऱ्या या गाडीच्या कोचमध्ये प्रवाशांसाठी मोबाइल व लॅपटॉप चार्जिंग सुविधा पुरवण्यात आली असून दृकश्राव्य संदेशप्रणाली असणार आहे. हे कोच लवकरच मेट्रोच्या उन्नत मार्गावर चढवण्यात येतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष गाडी धावण्याच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - पुणेकरांना हायकोर्टाचा दिलासा, रामवाडी ते वनाज दरम्यान मेट्रोच्या कामाला हिरवा कंदील
Pune Metro | पुणे मेट्रोचं 40 टक्के पूर्ण, जानेवारीमध्ये मेट्रोची ट्रायल रन | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement