Maval Loksabha election : मावळ लोकसभेचा उमेदवार कोण असावा? ; उमा खापरे थेटच बोलल्या...
मावळ लोकसभेचा उमेदवार कमळावर लढला पाहिजे. अशी ठाम भूमिका घेत भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरेंनी ही मावळवर दावा ठोकला आहे. त्यामुळं बारणे भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला आणखी उत आलंय.
मावळ, पुणे : मावळ लोकसभेचा उमेदवार कमळावर लढला पाहिजे. अशी ठाम भूमिका (Maval Loksabha) घेत भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरेंनी (Uma Khapre) ही मावळवर दावा ठोकला आहे. त्यामुळं बारणे भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला आणखी उत आलंय. विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंनी मीच महायुतीचा उमेदवार असेन असं म्हणत आधीच संदिग्धता कायम ठेवली आहे. पण आता उमेदवार श्रीरंग बारणे असो की अन्य कोणी? तो कमळाच्या चिन्हावरचं लढायला हवा. अशी भूमिका खापरेंनी घेतल्यानं बारणे भाजपमध्ये प्रवेश करणार का? या चर्चेला पुन्हा उत आलेलं आहे. दरम्यान आपल्याला याबाबतची कल्पना नसल्याचं चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगतापांनी म्हटलंय. त्यामुळं भाजपमध्ये ही एक वाक्यता नसल्याचं समोर आलं.
मावळमध्ये कमळावरुन निवडणूक लढवण्यात यावी!
उमा खापरे म्हणाल्या की, मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवड विधानसभा, पनवेल विधानसभा आहेत. मावळ हा लोकसभा मतदारसंघ आतातरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असला तरी तो भाजपचाच होता. मावळात भाजप मोठ्या प्रमाणात आहे. पिंपरीत देखील भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे मावळमध्ये कमळावरुन निवडणूक लढवण्यात यावी, अशी आमची इच्छा आहे. मावळमधील उमेदवार ठरवणं आमच्या हाती नाही तो निर्णय पक्षाचा असेल मात्र उमेदवार भाजपचाच हवा,अशी माणी त्यांनी केली आहे. भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडणून आणण्याचं काम आम्ही करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी!
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, मावळमध्ये भाजपचा उमेदवार असावा, असं आम्हाला वाटतं. मात्र महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभं राहणार आहोत.
मावळचा महायुतीचा उमेदवार 'मीच'
मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जातायेत, असं असतानाच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी (Shrirang Barne) मी महायुतीचा उमेदवार असेल, असं ठामपणे म्हटलंय. पण कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? असं विचारल्यावर 'मी महायुतीचा उमेदवार असेल' असं म्हणत बारणेंनी संदिग्धता कायम ठेवली आहे.
मावळ लोकसभेत महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आणि आमची लढत भाजपसोबत असल्याचं थेट बोलून दाखवलं आहे. त्यात आता महायुतीकडून मावळमध्ये कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-