लॉकडाऊनदरम्यान बंद असलेलं पुण्यातील मार्केटयार्ड रविवारपासून सुरू
शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीने मार्केटयार्डमधील व्यवहार परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : शहरातील गुलटेकडी परिसरातील भाजीपाला आणि फळांचा बाजार असलेलं मार्केटयार्ड लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून बंद आहे. या मार्केटयार्डमध्ये काम करणारे बहुतांश कामगार रेड झोन परिसरात राहणारे असल्यामुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीने मार्केटयार्डमधील व्यवहार परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या शनिवारी (30 मे) रात्रीपासून मार्केटयार्डमध्ये भाजीपाला फळांच्या गाड्या येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रविवारी (31 मे) पहाटे पाचपासून हा बाजार सुरू होईल. मार्केटयार्डमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के आडते एका दिवशी तर 50 टक्के आडते दुसऱ्या दिवशी याप्रमाणे काम करतील. अशाप्रकारे बाजार सुरू राहिल्यास फिजीकल डिसटन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही.
सध्या सर्व बाजार परिसराचे निर्जंतुकीकरण सुरू आहे. बाजार सुरू होईल त्या दिवशी प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था केली जाईल. थर्मलगनद्वारे बाजारात येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान नोंदवले जाईल, मर्यादित लोकांना प्रवेश दिला जाईल.अशाप्रकारच्या उपाययोजना करून मार्केटयार्ड परिसरातील व्यवहार सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :