एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील प्लाझ्मा थेरपीच्या यशस्वी प्रयोगानंतर ICMR इतर रुग्णालयांना परवानगी देण्याच्या तयारीत
पुण्यात प्लाझ्मा थेरपीच्या यशस्वी प्रयोगानंतर ICMR इतर खासगी रुग्णालयांना परवानगी देण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा थेरपी काम कशी करते, याचा आढावा घेतला आहे.
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात एका कोरोना रुग्णावर करण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे. या रुग्णाला आज किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर इतर खासगी रुग्णालयांना देखील प्लाझ्मा थेरपीची परवानगी देण्याची तयारी केंद्र सरकाराच्या आयसीएमआर या संस्थेने सुरू केलीय.
ही प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय असते, ती नक्की कोणत्या प्रकारच्या रुग्णांवर करता येते, ही थेरपी यशस्वी ठरण्याचं प्रमाण किती आहे आणि या थेरपीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करायचा झाल्यास त्यासाठी प्लाझ्मा कसा गोळा करावा लागेल हे आम्ही प्लाझ्मा आणि ब्लड कलेक्शनचं काम करणाऱ्या पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉक्टर अतुल कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेतलं.
Plasma Therapy | पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी
प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय असते?
- एखाद्या विषाणूवर जेव्हा लस किंवा औषध सापडत नसतं तेव्हा तातडीचा उपाय म्हणून प्लाझ्मा थेरपीचा उपयोग ज्यांची प्रकृती खालावली आहे, अशा रुग्णांवर केला जातो.
- एखाद्या विषाणूचा संसर्ग झालेली व्यक्ती जेव्हा त्या आजारातून बरी होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात त्या विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी तयार झालेल्या असतात.
- बरे झालेल्या धडधाकट व्यक्तींच्या शरीरातील रक्तातून प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने अँटीबॉडी मिळवल्या जातात.
- या अँटीबॉडीज ज्या रुग्णाला गरज आहे, अशा रुग्णाच्या शरीरातील रक्तात सोडल्या जातात.
- या अँटीबॉडीज त्या रुग्णाच्या रक्तात मिसळून रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत होते.
- कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अनेक ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करण्यात आलाय. काही ठिकाणी तो यशस्वी ठरलाय तर काही ठिकाणी या थेरपीला अपयश आलंय.
- या थेरपीचे अधिकाधिक प्रयोग करून ही थेरपी नक्की कोणत्या प्रकारच्या रुग्णांवर करता येईल, कोणत्या वयोगटातील रुग्णांवर करता येईल याचे निष्कर्ष काढण्याचं काम जगभरातील शास्त्रज्ञ करतायत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement