Sunetra Pawar : पुरंदरमध्ये महायुतीचे नेते एकवटले; विजय शिवतारे, जय पवारांच्या संयुक्त दौऱ्याला सुरुवात
पुरंदर तालुक्यात महायुतीचे सर्व नेते एकवटले असून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. काल अजित पवारांनी कन्हेरीच्या मारोतीचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आणि सभा घेऊन पवारांवर फटकेबाजी केली.

पुरंदर, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या हालचालींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामतील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) अशी लढत आहे. त्यातच बारामतील महायुतीत काही दिवसांपासून नाराजी दिसत होती. त्यात विजय शिवतारेंनी बंड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शिवतारेंचं बंड थंड झालं. भाजपच्या काही नेत्यांकडूनही काही प्रमाणात विरोध दिसला मात्र आता सगळा बंड आणि विरोध शमला असून सगळे महायुतीचे नेते सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) प्रचारासाठी एकवटलेले दिसत आहे.
पुरंदर तालुक्यात महायुतीचे सर्व नेते एकवटले असून त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. काल अजित पवारांनी कन्हेरीच्या मारोतीचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आणि सभा घेऊन पवारांवर फटकेबाजी केली. त्यानंतर आजच सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप नेते बाबा जाधवराव आणि जय पवार यांचा संयुक्त दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुरंदर तालुक्यातील मांडकी येथून हा दौरा सुरु करण्यात आला आहे. उमेदवार संसदेत जाण्यासाठी घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन महायुतीच्या नेत्यांकडून यावेळी करण्यात येत आहे.
सुनेत्रा पवारांना विजयी करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. सगळ्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मतदानासाठी विनंती करताना अजित पवार दिसत आहे. त्यातच आता शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनीदेखील कंबर कसल्याचं दिसत आहे. विजय शिवतारेंनीदेखील सुनेत्रा पवारांना विजयी करण्याता चंग बांधला आहे. सासवड तालुक्यातदेखील मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून शिवतारेंनी आणि राज्याच्या महायुतीच्या महत्वाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांंना विजयी कऱण्याचं आवाहन केलं होतं. आता इंदापूरातच पुन्हा एकदा संयुक्त प्रचाराला सुरुवात केली आहे. विकास आणि बारामतीचे वेगवेगळे प्रश्न समोर ठेवत त्यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचा विश्वास देत प्रचार करताना दिसत आहे.
बारामतीत सुप्रिया सुळेंचा प्रचारदेखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पवार कुटुंबातील प्रत्येकजण सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे बारामतीत गड कोण जिंकणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-























