Supriya Sule Vs Jay Pawar : महावीर जयंतीच्या मिरवणुकीत आती अन् भाचा आमनसामने; जयला पाहून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळे यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवून जैन बांधव समाजाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. याच दरम्यान त्यांनी रथामध्ये निघालेल्या भगवान महावीर यांचे दर्शन देखील घेतले.
पुणे : मागील काही दिवसांपासून पवार कुटुंब (Pawar Family) विरुद्ध पवार कुटुंब असं चित्र सगळ्या राज्यानं पाहिलं आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादीत फूट पाडल्यापासून पवार कुटुंबियातदेखील चांगलीच फूट पडली आहे. त्यातच सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहे. पवार कुटुंबातील मुलांमध्येही कटूता निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच महावीर जयंतीच्या मिरवणूकीत योगायोगानं आत्ते-भाचे एकत्र आले. यावेळी आत्याने म्हणजेच सुप्रिया सुळेंनी भाच्याची म्हणजेच अजित पवारांचा मुलगा जय पवारांची आत्मियनेते विचारपूस केली. जय कसे आहात?, अशी विचारणा सुप्रिया सुळेंनी केली तर आम्ही बरे आहोत, असं उत्तर जय पवारांनी सुप्रिया सुळेंनी दिलं.
नेमकं काय घडलं?
बारामती शहरात आज महावीर जयंतीची मिरवणूक निघाली. या मिरवणुकी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवून जैन बांधव समाजाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. याच दरम्यान त्यांनी रथामध्ये निघालेल्या भगवान महावीर यांचे दर्शन देखील घेतले. याचवेळी दर्शनासाठी जय पवार हे देखील दाखल झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रथम जय पवार यास भगवान महावीर यांचे दर्शन घेत असताना विचारपूस देखील केली. एकाच वेळी आपल्या विरोधात असणाऱ्या सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आले असल्याने जैन बांधवांमध्ये उत्साह निर्माण झाला.
पवार विरुद्ध पवार की...?
बारामतीच्या पवारांच्या राजकारणावर कायमच राज्याचं लक्ष राहिलं आहे. त्यात पवार कुटुंबीय कसे एकत्र असतात, याचा प्रत्यय प्रत्येक मोठ्या सणाच्या वेळी आला आहे. दिवाळी, रक्षाबंधनाला पवार कुटुंबीयांच्या नात्याचा गोडवादेखील अनेकांनी गायला आहे. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांनी फूट पाडली आणि भाजपसोबत सामील झाले. त्यादिवसापासून पवार विरुद्ध पवार लढाई सुरु झाली. राजकारण सोडलं तर कुटुंब म्हणून आम्ही पवार एकत्र असल्याचे अनेक दाखले देण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकदा कुटुंबातदेखील फूट पडल्याचं दिसून आलं. त्यातच आधी दबक्या आवाजात एकमेकांवर टीका करणारे पवार आता थेट सभेतून एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहेत. अजित पवार विरुद्ध पवार कुटुंब असं चित्र असलं तरीही आज सुप्रिया सुळे आणि जय पवारांंमध्ये झालेला संवाद पाहता नातं कायम असल्याचं दिसून आलं.
इतर महत्वाची बातमी-