Devendra Fadanvis On Sharad Pawar : शरद पवारांनी 40 वर्षांनी रायगड गाठला, याचं क्रेडिट अजितदादांनाच; देवेंद्र फडणवीस
अजित पवारांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे आणि किती वाजते हे पाहावं लागेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
पुणे : अजित पवारांमुळे (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) रायगडावर जावं लागलं. आता तुतारी कुठे आणि किती वाजते हे पाहावं लागेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' ला ते भेट देणार आहेत मात्र त्यापूर्वी त्यांनी माध्यमांसी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे. 'पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला. या कामगिरीसाठी पुणे पोलिसांचं विशेष अभिनंदन त्यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी शरद पवारांच्या रायगडावरील चिन्हाच्या लॉंचिंगच्या कार्यक्रमावर टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
'मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की शेवटी 40 वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले. अजित दादांना एका गोष्टीचा तर क्रेडिट द्यावाच लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी 40 वर्षानंतर अजितदादांमुळे शरद पवारांना रायगडावर जावं लागलं आता तुतारी कुठे वाजते कशी वाजते ते आपल्याला भविष्यात देखील दिसेलच', असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे.
पुणे पोलिसांचं कौतुक; अनेक राज्यात कारवाई करण्याची गरज
त्यासोबतच फडणवीसांनी पुणे पोलिसांचंदेखील कौतुक केलं. ते म्हणाले की, पुणे पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे. ज्याप्रकारे त्यांनी ड्रग्सचा हा संपूर्ण साठा शोधून काढला. नो टॉलरन्स फॉर ड्रग्स अशा पद्धतीची पॉलिसी राबवली आहे. त्याचप्रमाणे सगळे युनिट्सला अशा सूचना देण्यात आले आहे की केवळ ज्या ठिकाणी मुद्देमाल मिळतो त्या ठिकाणीच कारवाई सिमीत न ठेवता त्याचे बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज हे देखील शोधून काढा. याचे धागेदोरे राज्यातील अनेक ठिकाणी आहे हे पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे सामोर आले आहे. नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो यांना देखील सहकार्य करू.अशा पद्धतीची कारवाई देशाच्या अनेक राज्यांमध्ये करावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
लवकरच आम्ही जागावाटप करू!
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात आमची एक बैठक झालेली आहे. ती समाधानकारक झाली आहे. या संदर्भात आणखी एक बैठक आम्ही करू आणि लवकरच आम्ही जागावाटप करू. राहुल नार्वेकर असतील किंवा इतर कोणी यांच्या चर्चेवर नाव निश्चित होत नसतात. यामागे एक प्रोसेस असते. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर ज्यांची नावे पुढे येतील ती निश्चित तुम्हाला सांगण्यात येईल.
इतर महत्वाची बातमी-
Sunetra Pawar Baramati : बारामतीकरांचा खासदार ठरला? सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर