Lok Sabha Election : बारामती, मावळ, शिरुरमध्ये मतदार आक्रमक, थेट निवडणुकीवर बहिष्कार; काय आहे नेमकं कारण?
बारामती, मावळ, शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या लोकसभा मतदार संघाच्या विविध मागण्यांसाठी मतदानावर (Boycott of Voting) बहिष्कार टाकला आहे.
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. प्रत्येकजण मतदानाचं आवाहन करताना दिसत आहे. उमेदवार प्रत्येक मतदारांच्या दाराशी जाऊन भेटीगाठी घेत आहे. एवढंच नाही तर मतदारांचे प्रश्न जाणून घेताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही मतदानाचं आवाहन (Boycott of Voting) करण्यात येत आहे. तर निवडणूक आयोगाकडून प्रत्येक गावात मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र तरीही बारामती, मावळ, शिरुर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या लोकसभा मतदार संघाच्या विविध मागण्यांसाठी मतदानावर (Boycott of Voting) बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वे गाडी या मागण्यांचा त्यात समावेश आहे. यासोबतच राज्यात तब्बल 65 गावातील 41 हजार 440 मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मावळ मतदारसंघात (Maval Loksabha Contituency) कोंडीची वाडी येथील 70 ते 80 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याच्या कामांसाठी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच जमिनीच्या अधिग्रहणाच्या मोबदल्यासाठी हनुमान कोळीवाडा आणि करंजा गावातील 400 ते 450 मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
त्यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Contituency) बहिष्कार टाकणार्या मतदार संघाची संख्या अधिक आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पान्हवळ गावातील 1200 ते 1300 मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यातच मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मोढवे गावातील 2 हजार 700 मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय तर दौंड शहराला उपनगरचा दर्जा द्यावा, लोकल सुरू करावा आणि उड्डाण पुलाच्या मागणीसाठी 3 हजार ते 3 हजार 500 मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरुर लोकसभा मतदार (Shirur Loksabha Contituency) संघाची राज्यात चर्चा झाली. महायुतीचा उमेदवार कोण असेल?,याची चर्चा रंगली. अखेर या ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे रिंगणात उतरले आहेत. मात्र याच मतदार संघात भुयारी मार्गाच्या मागणीसाठी खोडद, हिवरे, नारायणगाव गावातील 1200 ते 1300 मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-