एक्स्प्लोर

Ram Satpute : सोलापुरात विमानतळ अन् आयटी पार्क उभारणार, सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा शब्द

Solapur Lok Sabha Election 2024 : मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन, असं सोलापूर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना शब्द देत म्हटलं आहे

सोलापूर : पंतप्रधान मोदीजींजवळ (PM Modi) जाऊन बसेन पण विमानतळ (Airport) सुरु करेन हा माझा शब्द आहे, असं म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी सोलापूरकरांना शब्द दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर प्रचार आणि सभांचा धडाका सुरु झालेला पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहे. अशात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलेल्या टीकेला राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे.

विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द

ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरु होईल. त्यासाठी मी मोदीजींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरु करेन हा माझा शब्द आहे. सोलापुरातील एमआयडीसी पुन्हा नव्या जोमाने उभा करेन. चादर आणि टॉवेल उद्योगासाठी टेक्स्टाईल पार्क उभं करणार, सोलापुरातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंसाठी वर्ल्ड क्लास एक्जीबिशन सेंटर उभारणार, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी, मी त्यांना बोलणार नाही. 

सोलापूरकरांसाठी आयटी पार्क उभा करणार

पुढील पाच वर्षात सोलापूरला 25 वर्षे पुढे नेईल हा शब्द देतो. विमानतळ सुरू झाल्यानंतर सोलापूरकरांसाठी उत्तम प्रकारचं आयटी पार्क उभा करणार, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे, अशी घोषणा भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे. ते सोलापुरातील प्रचारादरम्यान बोलत होते.

10 वर्षात भाजप खासदार काहीही करू शकले नाहीत

गेल्या दहा वर्षात भाजपच्या खासदाराने सोलापूरसाठी काही केलं नाही. सोलापूरचे खासदार विमान सेवा सुरू करू शकले, पाईपलाईन आणू शकले नाही, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्या पुढे म्हणाल्या होत्या की, आज भाजपचे उमेदवार येतात, पण ते 10 वर्षात काय करू शकले, हे सांगू शकत नाहीत, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. यानंतर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

आता फक्त विकास बोलणार

मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पुण्याच्या धर्तीवर सोलापूरमध्ये आंतराराष्ट्रीय विमानतळ उभारणार आहे. ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. यापुढे आम्ही प्रणिती शिंदे यांना विनम्रपणे सांगतो की, तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या, तरीही मी तुम्हाला उत्तर देणार नाही. केवळ विकास, विकास, विकास हे बोलणार, असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kashmir Tourists Crowd :  काश्मीरमध्ये थंडीमुळे धबधबेही गोठले, पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी ABP MajhaChhagan Bhujbal on Maharashtra Cabinet | आम्ही त्रस्त आहोत, ओबीसी नेत्यांचं म्हणणं- छगन भुजबळGuardian Minister Special Reportपालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! महायुती सरकारसमोर पालकमंत्र्यांंचं कोडं?Praniti Shinde PC | अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे, प्रणिती शिंदेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget